शरद पवार यांच्या वाढदिवशी केला होता संकल्प; नववर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षवाढीसाठी ‘मास्टर प्लान’


हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी काँग्रेसने नववर्षाला केली नवी सुरुवात
  • ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रभावी – प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी’ उपक्रम
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली माहिती
  • राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा आपला प्रयत्न – जयंत पाटील

मुंबई: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी, आज, शनिवारी वाळवा तालुक्यातील साखराळे गावात उपस्थित राहून ‘एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी, प्रभावी – प्रगल्भ तरुण पुरोगामी विचारांसाठी’ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपक्रमाची सुरुवात पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देशाचे नेते शरद पवार यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. आपल्या पक्षाच्या मागे विचारांची एक मोठी ताकद आहे. या विचारांचा प्रसार करण्यासाठी आपण हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रवादी विचारांच्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा आपला प्रयत्न आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोठा दणका; ४०० हून अधिक तळीरामांची उतरवली ‘झिंग’
Kalyan Crime News : रिक्षात ५ प्रवासी बसले होते, अचानक त्यातील एकाने रिक्षाचालकाच्या मानेवर….

महिन्याच्या पहिल्या शनिवारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत बैठक घ्यावी. वैचारिक देवाणघेवाण करावी. आपल्या गावाचा, तालुक्याचा आणि शहर, तसेच जिल्ह्याचा विकास कसा होईल यासाठी विचारमंथन करावे, असेही आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. आपला पक्ष हा शिस्तप्रिय आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त रुजली पाहिजे यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन शरद पवार यांच्या वाढदिवशी जयंत पाटील यांनी केले होते. त्याची सुरुवात आजपासून करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी
ओबीसी आरक्षणाविना पालिका निवडणुका

महाराष्ट्रात एकही असा तालुका नाही जिथे शरद पवार यांच्या विचारांना मानणारा वर्ग नाही. माणसाने आयुष्यात काय कमावले पाहिजे तर ती माणसे हे पवार यांनी त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या माणसांच्या धनामुळे सिद्ध केले आहे. पवार यांच्या विचारांची वैचारिक शिदोरी आपल्याकडे आहे. ती शिदोरी महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली पाहिजे, या विचारधारेने प्रत्येक कार्यकर्ता प्रेरीत झाला पाहिजे. हा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी एक तास राष्ट्रवादीसाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

सध्या उपलब्ध असलेल्या प्रत्येक माध्यमातून सातत्याने होणाऱ्या जातियवादी विचारांच्या प्रसाराऐवजी एक प्रगल्भ नवी पिढी जर आपल्याला घडवायची असेल तर एक – दोन तास पक्षासाठी देणे आवश्यक आहे असेही जयंत पाटील म्हणाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *