Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात स्वत: भूकेलेल्या आई-बापांवर पोटच्या पोरांना विकायची वेळ!


हायलाइट्स:

  • तालिबाननं बळजबरीनं अफगाणिस्तानातील सत्ता आपल्या हाती घेतल्यानंतर…
  • १० वर्षांच्या मुलीची लग्नासाठी विक्री
  • अगतिकतेतून पालकच आपल्या मुलांना विकताना समोर

वृत्तसंस्था, शेदाई कॅम्प (अफगाणिस्तान) :

अफगाणिस्तानच्या पश्चिम भागातील एका वस्तीतल्या १० वर्षांच्या कांदी गुल या मुलीला लग्नासाठी म्हणून ‘विकण्यात’ आलंय… तेही तिच्या जन्मदात्या बापाकडून… दुष्काळ आणि युद्धाने होरपळलेल्या निर्वासितांच्या झोपड्यांमध्ये राहणाऱ्या या कुटुंबाला आपल्या इतर पाच मुलांना जगवायचं असेल, तर या एका मुलीवर पाणी सोडण्यावाचून अन्य पर्याय राहिलेला नाही…

युद्धग्रस्त अफगाणिस्तानातील ही अशी एकमेव कहाणी नाही. गरिबीच्या भोवऱ्यात भेलकांडून गेलेल्या अनेक कुटुंबांनी कमालीच्या अगतिकतेतून आपल्या पोटच्या मुलांना विकण्याचा निर्णय घेतला आहे… आणि अशांची संख्या वाढतच आहे.

Watch Video: ‘डूरंड लाईन’वर तालिबान्यांनी पाक लष्कराला सळो की पळो करून सोडलं!
Hong Kong: हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थक मीडियावर चीनकडून कारवाई, देशद्रोहाचे गुन्हे दाखल
आधीच परदेशी मदतीवर अवलंबून असलेल्या अफगाणिस्तानातून अमेरिकी फौजांनी काढता पाय घेताच, ऑगस्ट महिन्यात तालिबान्यांनी ताबा मिळवला. क्रूर राजवटीची पार्श्वभूमी असलेल्या तालिबान्यांसोबत संबंध न ठेवण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय समुदायाने अफगाणिस्तानच्या मालमत्ता गोठवल्या आणि मदतही थांबवली. मात्र युद्ध, दुष्काळ आणि करोनासाथीच्या झळांमुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या अफगाणिस्तानची यामुळे अधिकच अन्नान्नदशा झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना कित्येक महिने वेतन मिळालेले नाही, दुर्बल गटापुढे उपासमारीची समस्या उभी राहिली आहे आणि देशाची जवळजवळ अर्धी लोकसंख्या भीषण अन्नटंचाईचा सामना करत आहे.

‘दिवसेंदिवस अफगाणिस्तानातील परिस्थिती अधिकाधिक भीषण होत चालली असून विशेषत: लहान मुलांच्या हालांना पारावर उरलेला नाही. पोटात चार कण पडावेत म्हणून मुलांनाही विकायला तयार झालेली कुटुंबे पाहून जीव तुटत आहे’, या शब्दांत वर्ल्ड व्हिजन या मदत संस्थेच्या असुंथा चार्ल्स यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

India China: अरुणाचलच्या १५ भागांना ‘चिनी’ नावं घोषित, नेमका काय आहे चीनचा कुटील डाव?
कोण आहे ‘बिटकॉईन’चा शोधकर्ता? एलन मस्कनं रहस्यावरून हटवला पडदा…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *