यूपीचे मंत्री वादात; म्हणाले, ‘JNU मध्ये सेक्स स्कँडल चालवले जाते, राहुल गांधी, दीपिका पदुकोणही जातात’


अलिगड : उत्तर प्रदेशातील योगी सरकारमधील राज्यमंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाबाबत (JNU) वादग्रस्त वक्तव्य केले आहे. दिल्लीच्या जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल चालते. इतकंच नाही तर राहुल गांधींसह काँग्रेसचे बडे नेते तिथे जातात असेही ते म्हणाले. अभिनेत्री दीपिका पदुकोणही जाते, असे वादग्रस्त वक्तव्य मंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी केले आहे.

‘पंडित नेहरूंच्या रणनीतीनुसार जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची स्थापना झाली. पण जेएनयूमध्ये सेक्स स्कँडल चालवले जाते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कम्युनिस्ट आणि देशद्रोही वाढले आहेत. देशद्रोही तिथे सेक्स स्कँडल चालवतात. राहुल गांधी आणि दीपिका पदुकोणसारखे मोठे लोकही तिथे जातात. तिथे देशद्रोही लोक जमा होत आहेत. पण आगामी काळात या देशद्रोही शक्तींना ठेचून काढू, असे मंत्री ठाकूर रघुराज सिंह अलिगडमध्ये म्हणाले.

मंत्री रघुराज एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनीही पुढेही वक्तव्य केले. ‘अलिगड मुस्लिम विद्यापीठात हिंदू विद्यार्थ्यांना उर्दू सक्तीचे करू नये. हिंदू विद्यार्थ्यांना हिंदी येते. हिंदीचा अभ्यास केला पाहिजे. काँग्रेस सरकारला अल्पसंख्याक विद्यापीठ बनवायचे होते. पण हे हिंदुस्थान विद्यापीठ होईल, असे ते बोलले.

up election : यूपी निवडणूक वेळेतच; का भाजप, काँग्रेस आणि ‘सपा’ने सोडला सुटकेचा नि: श्वास? बघा काय आहे कारण…

रघुराज सिंह आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असतात. हे त्यांचे वक्तव्य पहिले नाही. काही दिवसांपूर्वी मदरशांबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. जर देवाने संधी दिली तर मी देशातील सर्व मदरसे बंद करेन. मदरशे दहशतवाद्यांचे अड्डे आहेत. येथून प्रशिक्षण घेतल्यानंतर दहशतवादी विचार फोफावतो, असा आरोप मंत्री ठाकूर रघुराज सिंह यांनी केला होता.

malegaon blast : मालेगाव बॉम्बस्फोट; यूपीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा हल्लाबोल, म्हणाले…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *