Sindhudurg Bank Election: ‘अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास?; पुढची २५ वर्सा आघाडीची सत्ताच रवतली’


हायलाइट्स:

  • सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची सरशी
  • आशिष शेलार यांची महाविकास आघाडीवर मालवणी भाषेत टीका
  • सचिन सावंत यांनी दिलं जशास तसं उत्तर

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक निकालावरून सध्या सत्ताधारी महाविकास आघाडी व विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांमध्ये टीकेच्या गजाली रंगल्या आहेत. केंद्रीय नारायण राणेंच्या नेतृत्वाखाली भाजपनं पुन्हा एकदा ही बँक ताब्यात घेतल्यानंतर भाजपनं आघाडीवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी मालवणी भाषेत ट्वीट करून सत्ताधाऱ्यांवर खोचक टीका केली होती. त्यांच्या या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी मालवणीतच उत्तर दिलं आहे. त्यांची ही मालवणी टीकाटिप्पणी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

वाचा:
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निकाल: भाजपच्या विजयावर फडणवीस मोजकं, पण सूचक बोलले!

जिल्हा बँक निवडणुकीत भाजपनं वर्चस्व राखल्यानंतर भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ट्वीट केलं आहे. सिंधुदुर्ग बँकेचा निकाल हा मुंबई, ठाणे व नवी मुंबई महापालिकेच्या निकालची नांदी आहे. हिंमत असेल तर तिन्ही पक्षांनी एकत्र लढायला यावे, आम्ही तयार आहोत, असं शेलार यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर, शेलार यांनी मालवणी भाषेत आघाडी सरकारला टोला हाणला आहे. ‘देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल लागताच नीलेश राणेंचं नेहमीच्या भाषेत ट्वीट, म्हणाले…

शेलारांच्या या टीकेला सचिन सावंत यांनी तितकंच जोरदार उत्तर दिलं आहे. ‘शेलारानु, अर्ध्या हळकुंडान पिवळे कित्याक व्हतास? एक खुय जिल्हा बॅंक निवडणूक जिंकलास तरी आमका काय फरक पडाचो नाय. तुमी कितीव हातपाय आपटलास तरी राज्याच्या सत्तेत आमीच आसव! पुढची २५ वर्सा महाविकास आघाडीची सत्ताच रवतली. तुमी वाट बगा. तुमच्या भ्रमाचो भोपळो भाजपाच्याच टाळक्यावर फुटतलो,’ असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *