नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात ४ जणांचा मृत्यू


हायलाइट्स:

  • आळणी येथे भीषण अपघात
  • अपघातात ४ जणांचा मृत्यू
  • कंटेनर व चारचाकीची धडक

उस्मानाबादः औरंगाबाद – सोलापुर हायवेवरील उस्मानाबाद जवळील आळणी फाटयाजवळ आज सकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे.

नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येलाच हा अपघात झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आळणी फाट्याजवळ कंटेनर क्रमाक एम. एच ०४ एफ बी २०५५ हा ट्रक्टरघेवून औरंगाबादकडे जात होता. तर एम एच २४ एए ८०५५ हि कार लातूरकडे जात होती. यावेळी या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. अपघातग्रस्त गाडी एम एच २४ एए ८०५५ मधील ४ जण ठार झाले असुन ही कार लातूर येथील आहे.

वाचाः धक्कादायक! ८ महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू, वर्षाच्या अखेरी काळजाचा ठोका चुकावणारी घटना

आज सकाळी हा अपघात झाला असुन वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील हिरकणाबाई मुरलीधर पाडे वय – ७०, उमेश मुरलीधर पाडे वय-५०, सविता उमेश पाडे वय – ४५, प्रतिक उमेश पाडे वय -२३ रा.प्रकाश नगर लातूर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सदर चारही मृतदेह येडशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन नातलगाच्या ताब्यात देण्यात आले असून या अपघाताची नोंद उस्मानाबाद ग्रामीण पोलीस स्टेशनला झाली असून पोलीस निरिक्षक एस एन साबळे हे तपास करत आहेत.

वाचाः धक्कादायक! आईने ४ लेकरांसह केली आत्महत्या, ३ मुली आणि एका मुलाला घेऊन शेतात गेली अन्…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *