Watch Video: ‘डूरंड लाईन’वर तालिबान्यांनी पाक लष्कराला सळो की पळो करून सोडलं!


हायलाइट्स:

  • पाकिस्तान – अफगाणिस्तानात सीमावाद
  • डुरंड रेषा तालिबानला अमान्य
  • कुंपण उभारणाऱ्या पाक सेनेला तालिबान्यांचा दणका

काबूल / इस्लामाबाद :

अफगाणिस्तानात तालिबाननं सत्ता हाती घेतल्यानंतर तालिबानला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानला आता मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागतोय. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील ‘डुरंड लाईन‘वर पाकिस्ताननं कुंपण घालण्याचा केलेला प्रयत्न तालिबाननं हाणून पाडलाय. इतकंच नाही तर तालिबानच्या विरोधामुळे पाकिस्तानी लष्कराला आपली हत्यारं आणि साहित्य जागच्या जागी टाकून पळ काढावा लागल्याचं समोर येतंय.

काही दिवसांपूर्वी तालिबान आणि पाकिस्तानी लष्करादरम्यान चकमकीचाही प्रसंग उद्भवला होता. ताज्या घटनेत अफगाणिस्तानातील निमरोज प्रांतातील चार बोर्झाक जिल्ह्यात तालिबान्यांनी पाकिस्तानी लष्करावर कंबरेला पाय लावून पळ काढण्याची वेळ आणली.

अफगाणिस्तानातील प्रसिद्ध पत्रकार बिलाल सरवारी यांनी तालिबानचा हवाला देत ही माहिती दिलीय. पाकिस्तानी लष्करानं पश्चिम अफगाणिस्तानातील चार बोर्झाक जिल्ह्यात कुंपण घालायचा प्रयत्न केला. परंतु, तालिबाननं मोठ्या संख्येत आपलं सैन्य इथं पाठवलं. यानंतर भेदरलेले पाकिस्तानी सैनिक इथून अक्षरश: पळून गेले. कुंपण उभारण्यासाठी आणलेली वेगवेगळी उपकरणं त्यांना जागीच सोडावी लागली.

गनी म्हणतात, ‘सकाळी माहीत नव्हतं की दुपारपर्यंत अफगाणिस्तान सोडावं लागेल’
India China: अरुणाचलच्या १५ भागांना ‘चिनी’ नावं घोषित, नेमका काय आहे चीनचा कुटील डाव?
यापूर्वी तालिबानसोबतचा आपला वाद मिटल्याचा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता. मात्र, वास्तवत: अशी परिस्थिती दिसून येत नाही. डुरंड लाईनवर तालिबानकडून मोठ्या प्रमाणावर सैन्य तैनात करण्यात आलंय.

दिवसेंदिवस ‘डुरंड लाईन’वरून तालिबान आणि पाकिस्तानमधील वाद वाढत चाललाय. तालिबाननं अफगाण सीमेवर पाकिस्ताननं घातलेल्या कुंपणावर तीव्र आक्षेप व्यक्त करत थेट युद्धाची धमकी दिलीय. तसंच तालिबानकडून डुरंड रेषेवरील पाकिस्ताननं उभारलेलं कुंपण पाडण्यात आलंय.

‘डुरंड लाईन’ या एकमेव मुद्द्यावर अफगाणिस्तानातील माजी नागरी सरकार आणि तालिबान यांच्यात एकमत होतं. तालिबानला सुरुवातीपासूनच पाकिस्तान – अफगाणिस्तानमधील सीमा असलेली ‘डुरंड लाईन’ मान्य नाही. अफगाणिस्तानचे क्षेत्र सध्याच्या सीमेच्या पलीकडे असल्याचा दावा तालिबाननं केलाय.

अफगाणिस्तानातील बहुसंख्य पश्तून आणि तालिबान्यांनी डुरंड रेषेला अधिकृत सीमारेषा मानण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. अफगाण सरकार लवकरच या विषयावर आपली अधिकृत भूमिका जाहीर करेल, असं वक्तव्य तालिबानचा सर्वोच्च प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद यानं अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर लगेचच जाहीर केलं होतं.

पाकिस्ताननं उभारलेल्या कुंपणामुळे कुटुंबं विभक्त झाली आहेत, असा दावा तालिबानकडून करण्यात आलाय. आम्हाला सीमेवर सुरक्षित आणि शांततापूर्ण वातावरण निर्माण करायचं असल्याचंही मुजाहिद यानं म्हटलं होतं.

Russian Military Satellite: रशियाचा गुप्तचर उपग्रह पृथ्वीला धडकणार? तज्ज्ञांचा इशारा
Hong Kong: हाँगकाँगमध्ये लोकशाही समर्थक मीडियावर चीनकडून कारवाई, देशद्रोहाचे गुन्हे दाखलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *