सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक निकाल: भाजपच्या विजयावर फडणवीस मोजकं, पण सूचक बोलले!


हायलाइट्स:

  • सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा विजय
  • देवेंद्र फडणवीस यांनी दिली सूचक प्रतिक्रिया
  • आशिष शेलार म्हणाले, ही मुंबईच्या विजयाची नांदी

पुणे/मुंबई: सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीचा (Sindhudurg District Bank Election Results) निकाल भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं लागला आहे. एकूण १९ जागांवर झालेल्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलनं ११ जागा पटकावून बाजी मारली आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे प्रमुख उमेदवार व बँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांचाही पराभव झाला आहे. या निकालानंतर भाजपच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ही संधी साधत सूचक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

वाचा: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा निकाल लागताच नीलेश राणेंचं नेहमीच्या भाषेत ट्वीट, म्हणाले…

देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्वीटमध्ये महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘सरकारी यंत्रणेचा गैरवापर, पोलिसी दडपशाही, सत्तेची अरेरावी हे सगळं काही झुगारून मतदारांनी लोकशाही निवडली. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा दणदणीत विजय झाला आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. या विजयाबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह इतर नेते व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं आहे.

देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही तिखट प्रतिक्रिया दिली आहे. ‘सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत अपेक्षेनुसार भाजपाच्या विजयाने सुरुवात झाली आहे. १९ पैकी ११ जागांवर आमचं वर्चस्व कायम राहिलंय. सत्तेच्या जोरावर सुरू असलेलं राजकारण, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नीतेश राणे यांच्यावर सूडबुद्धीने चाललेल्या कारवायांना ही सणसणीत चपराक आहे,’ असं पाटील यांनी म्हटलं आहे.
ही मुंबईच्या निकालाची नांदी!

ही मुंबई, ठाणे व नवी मुंबईच्या महापालिका निकालाची नांदी आहे, असं भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. ‘देवांक सोडल्यान अन् देवचराक धरल्यान आणि विधान परिषदेत एक जागा गमवल्यान्…आज सिंधुदुर्गात आघाडीचा भोपळो फुटलो…,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ‘हिंमत असेल तर तिघेही एकत्र समोर लढाईला या आम्ही तयार आहोत,’ असं आव्हानही त्यांनी आघाडीला दिलं आहे.
वाचा: ठाकरे सरकारची चिंता वाढली! आणखी एका मंत्र्याला करोनाची लागणSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *