गारपीटीनंतर मराठवाडा गारठला, दिवसभर बोचऱ्या थंडीने नागरिक त्रस्त


हिंगोली : दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे मराठवाडा चांगलाच गारठला आहे. थंडीचा पारा घसरला असून बोचऱ्या थंडीचे वारे दिवसभर वाहू लागल्याने नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. आठवडाभरापासून सातत्याने वातावरणात सतत होणारे बदल अनुभवायला मिळत आहेत.

कधी ढगाळ वातावरण, कधी, ऊन व पाउस असे वातावरण तयार होत आहे. दोन दिवसापूर्वी झालेल्या गारपिटीमुळे काही जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. दिवसभर थंड वारे वाहू लागल्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी दिवसभर नागरिक उबदार कपड्यांचा वापर करत आहेत. सायंकाळ आणि सकाळी गावागावात शेकोटी सुद्धा पेटू लागले आहेत.

New Year Guidelines : नागरिकांनो, नववर्षाचे स्वागत घरीच करा; पालिकेचे नियम वाचलेत का?
सध्या वाढलेली थंडी ही रब्बीच्या पिकासाठी फायदेशीर ठरत आहे. दुसरीकडे या थंडीचा परिणाम मात्र नागरिकांच्या आरोग्यावर सुद्धा होऊ लागला आहे. थंडी ही बोचरी असल्यामुळे लहान बालके व वृद्धांना सर्दी खोकल्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वाढत्या थंडीमुळे सध्या रस्त्यावर उबदार कपडेसुद्धा विक्रीसाठी दाखल झालेत. खरेदीसाठी नागरिकांची दिवसभर असल्याचे बघायला मिळते. परिणामी दुग्ध व्यवसायावर सुद्धा या थंडीचा परिणाम जाणवतो आहे. जनावरांचा बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी धडपड करावी लागत आहे.

चिंताजनक! मुंबईनंतर ‘या’ जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या वाढतेय, २ दिवसांची धक्कादायक आकडेवारी समोरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *