सोनाली नवांगुळपाठोपाठ कोल्हापूरच्या आणखी एका लेखणीचा सन्मान!


हायलाइट्स:

  • कोल्हापूरच्या आणखी एका लेखणीचा सन्मान
  • किरण अनंत गुरव यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार
  • २२ प्रादेशिक भाषेतील पुरस्कार आज जाहीर झाले

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील अधीक्षक, मराठी कथालेखक आणि कादंबरीकार किरण अनंत गुरव यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. काही महिन्यापूर्वीच कोल्हापुरातील सोनाली नवांगुळ यांच्या ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या अनुवादित कादंबरीला हा पुरस्कार मिळाला होता. त्या पाठोपाठ गुरव यांना हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या ‘श्रीलिपी’ या पुस्तकातील ‘वडाप’ या कथेचा शिवाजी विद्यापीठातील अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. (Sahitya Akademi Award Winner)

दुसरीकडे, मराठीतील युवा लेखक प्रणव सखदेव यांना युवा साहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. २२ प्रादेशिक भाषेतील पुरस्कार आज जाहीर झाले. त्यामध्ये मराठीतील पुरस्कार गुरव यांना जाहीर झाला आहे. गुरव हे मूळचे राधानगरी तालुक्यातील आहेत.

covid india : महाराष्ट्रासह ८ राज्यांना केंद्राचा अलर्ट, ‘कठोर पावले उचला, तरच तिसरी लाट…’

यापूर्वी किरण गुरव यांचे ‘राखीव सावल्यांचा खेळ, ‘श्रीलिपी’, ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ व ‘क्षुधाशांती भुवन’ हे चार कथासंग्रह प्रकाशित आहेत. गुरव यांच्या ‘जुगाड’ या पहिल्याच कांदबरीस राज्य सरकारचा ‘ह.ना. आपटे पुरस्कार’ मिळाला असून ‘राखीव सावल्यांचा खेळ’ या पहिल्याच कथासंग्रहास महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या साहित्य लेखनासाठी कांताबाई आणि भंवरलाल जैन फाऊंडेशन यांच्याद्वारे दिल्या जाणाऱ्या निसर्गकवी ना. धो. महानोर पुरस्काराने सन्मानित केलं आहे.

संविधान आणि देशाच्या रक्षणासाठी सजगपणे काम करेन, मंत्री यशोमती ठाकूर यांचे ‘नव्या वर्षात नवे संकल्प’

गुरव यांच्या कथांचा राज्यातील विविध विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समावेश आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर किरण गुरव म्हणाले की, ‘साहित्य अकादमी पुरस्काराचा आनंद साहजिकच मोठा आहे. हा पुरस्कार माझ्याबरोबरच कथा या साहित्यप्रकाराला बळ देणारा आहे. हा पुरस्कार म्हणजे, माझ्यापेक्षा हा या कथेचा सन्मान असल्याचे मी समजतो. या पुरस्काराच्या क्षणी मनाला जयंत पवार या अफाट कथाकाराची आठवण कातर करते. या पुरस्काराने मराठी कथेला आणि खेड्यातील अनेक लिहित्या हातांना उर्जा मिळावी इतकीच अपेक्षा आहे.’Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *