गुलाबी थंडीचा परिणाम, खवय्यांच्या जीभेचे चोचले, सुकामेवा महागला तरीही दुकानांवर ग्राहकांची रीघ!


हिंगोली : सद्या कडाक्याची थंडी पडली आहे. या थंडीच्या दिवसात पौष्टिक वस्तू खाव्यात, असा सल्ला डॉक्टर देतात. या दिवसांमध्ये साजूक तुपातील मेव्यांचे लाडू करून ते पहाटे वा सकाळी उठून खाण्याची पद्धत अनेकं घरात पाहायला मिळते. हिवाळ्यामुळे बाजारात विविध प्रकारचे डिंकाचे लाडू, बदाम, काजू, किसमिस, खजूर, खारिक, खोबरे, मनुके उपलब्ध झाले आहेत. मागील एका आठवड्यापासून सुकामेवा आणि पौष्टिक लाडूंना मागणी वाढली आहे. एकंदरितच थंडीमुळे खवय्यांच्या जीभेचे चोचले चांगलेच वाढले आहेत.

ग्राहकांकडून खोबऱ्याला मागणी आहे. त्याचबरोबर बदाम, काजू, डिंक, गोडंबी, आळीव, अंजीर, अक्रोड, मगज, खसखस यांचा वापर डिंक लाडू, मेथीलाडू, पौष्टिक लाडू यांचं देखील मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं. त्यामुळे ह्या सुक्या मेव्यास मागणी वाढली आहे.

सुकामेव्याचेच भाव जास्त असल्याने रेडीमेड लाडू खरेदीकडे सुद्धा मोठी मागणी असते. ग्रामीण तसंच शहरातील गृहिणींकडून या सुका मेव्याची खरेदी करून घरीच लाडू तयार करण्यास पसंती दिली जाते. त्याचबरोबर दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे वातावरणातसुद्धा कमालीचा गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे सुक्यामेव्याबरोबरच थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर ,मफलर आदी उबदार कपड्यांची सुद्धा मागणी वाढल्याचे चित्र बघायला मिळते आहे.

हिंगोली शहरातील रस्त्यांवर उबदार कपड्यांसोबतच सुकामेव्याच्या पदार्थांची दुकाने थाटली असल्याची चित्र आहे. नागरिकही दुकानांवर गर्दी करत आहेत. वाढत्या थंडीमुळे हिंगोली जिल्हा गेल्या दोन दिवसापासून गारठला आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक सध्या उबदार कपड्यांसोबत शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *