पिंपरी-चिंचवडमधील ‘त्या’ मृत व्यक्तीच्या रिपोर्टमधून समोर आली नवी माहिती


हायलाइट्स:

  • ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढू लागली
  • राज्यात गुरुवारी १९८ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले
  • पिंपरी चिंचवडमधील मृत रुग्णाचाही अहवाल समोर

पिंपरी चिंचवड : राज्यातील करोनाबाधितांचं प्रमाण वाढत असताना ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढू लागली आहे. राज्यात गुरुवारी १९८ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एन.आय.व्ही.) याबाबत माहिती दिली आहे. तसंच पिंपरी चिंचवडमधील एका मृत रुग्णाचाही अहवाल समोर आला आहे. (Corona New Variant Omicron News)

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात एका ५२ वर्षाच्या पुरुषाचे २८ डिसेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले होते. नायजेरिया प्रवासाचा इतिहास असलेल्या या रुग्णाला मागील १३ वर्षांपासून मधुमेह होता. या रुग्णाचा मृत्यू कोविड शिवाय इतर कारणांनी (नॉन कोविड मृत्यू) झालेला आहे. मात्र गुरुवारी आलेल्या एनआयव्ही अहवालात त्याला ओमिक्रॉन विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

पुण्यात पुन्हा राडा: गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला

दरम्यान, एनआयव्हीच्या माहितीनुसार, १९८ ओमिक्रॉनबाधित रुग्णांमध्ये ३० आंतरराष्ट्रीय प्रवासी आहेत.

कोणत्या शहरात किती ओमिक्रॉनबाधित रुग्ण?

राजधानी मुंबईत गुरुवारी सर्वाधिक १९० ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले असून ठाणे मनपा क्षेत्रात ४ तर सातारा, नांदेड, पुणे मनपा आणि पिंपरी चिंचवड इथं प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ४५० ओमिक्रॉन विषाणूबाधित रुग्ण आढळले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *