चोरट्यांचे भलतेच धाडस; थेट बँक मॅनेजरच्या घरावर दरोडा टाकला,


हायलाइट्स:

  • चोरट्यांचा चक्क बँक मॅनेजर च्या घरावर डल्ला
  • दागिन्यांसह,पैसे आणि मोबाईल केले लंपास
  • हिंगोली जिल्ह्यात घडली घटना

हिंगोलीः शहरातील भारतीय स्टेटबँकमध्ये मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या कल्याणकर यांच्याघरी चोरट्यांनी दिवसाढवळ्या दरोडा घातला आहे. बँक मॅनेजरच्या घरीच दरोडा पडल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळं शहरात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

हिंगोलीमध्ये चोरटेसुध्दा पुन्हा ॲक्शन मोडवर येत दिवसाढवळ्या घारफोडी करू लागले आहेत. असाच काहीसा प्रकार हिंगोली शहरामध्ये घडला आहे. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. हिंगोली शहरातील भारतीय स्टेटबँक मध्ये मॅनेजर असलेल्या कल्याणकर यांच्या घरी चोरट्यांनी दिवसाढवळ्या जबरी चोरी केली आहे. बियाणी नगर परिसरात ही घटना आज दुपारी ३: वाजून ३० मिनिटानी घटना घडलीय.

वाचाः नव्या धानाचा मोबदल्यात चविष्ठ मुरमुरे देणारे गाव बघितलंय काय?

चोरट्यांनी सोन्याचे दागिने काही रोख रक्कम व महागडा मोबाईल पळविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी येथील यतीश देशमुख यांच्यासह इतरही कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिलीय. संशयित चोरट्यांचा श्वान पथकांच्या मदतीने पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. सध्यातरी या प्रकरणी नेमकी किती रक्कम व दागिने चोरीला गेले याची माहिती समोर आली नाहीये. मात्र घटनेमुळे शहरात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

वाचाः …अन्यथा नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी जेलची हवा खावी लागणार; जाणून घ्या हे नियमSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *