राज्यपालांचे अधिकार कमी केले, भाजपचे कार्यकर्ते चिडले, विद्यापीठ सुधारणा कायद्याची होळी


विकास दळवी, हिंगोली: महाविकास आघाडी सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विद्यापीठ सुधारणा विधेयक संमत केल्यामुळे भाजपचे नेते कार्यकर्ते पदाधिकारी चांगलेच आक्रमक झाले आहेत. याच निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार विरोधात हिंगोलीत आज युवा भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

हिंगोलीत भाजपची जोरदार निदर्शनं

कुलगुरु यांचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आल्याने त्याचा निषेध हिंगोलीत भाजपाच्या वतीने करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत या विधेयकाची होळी करत असताना पोलिसांनी आंदोकांना रोखलं.

यानंतर भाजप युवा कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देत भाजप कार्यालयासमोर या विधेयकाची होळी केली. भाजपचे हिंगोली युवा जिल्हा अध्यक्ष पप्पू चव्हाण, शिवाजी मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पार पडले.

राज्यातील सर्व विद्यापीठांच्या शैक्षणिक निर्णय प्रक्रियेत प्र-कुलपती या नात्याने राज्य सरकारच्या मंत्र्यांचा हस्तक्षेप असेल, अशी सुधारणा उद्धव ठाकरे सरकारने विद्यापीठ सुधारणा कायद्यात केली आहे. हिवाळी अधिवेशनात ही सुधारणा सरकारने केली.

ठाकरे सरकारकडून विद्यापीठ कायद्यात सुधारणा

एवढेच नाही तर विद्यापीठांचे कुलगुरू नेमण्याच्या प्रक्रियेतही कुलपती म्हणजेच राज्यपालांऐवजी राज्य सरकारचे अधिकार अधिक असणार आहेत. राज्य सरकारने पाठवलेल्या दोन नावांच्या शिफारसींपैकीच राज्यपालांना कुलगुरू म्हणून एकाची निवड करता येणार आहे. महाविकास आघाडी सरकारने या बदलांसह सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम विधेयक 2021 विधिमंडळात मंजूर केलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *