Kim Jong Un: या व्यक्तीला ओळखलंत का? पक्षाच्या बैठकीत असा दिसला उत्तर कोरियाचा ‘हुकूमशहा’


हायलाइट्स:

  • पक्षाच्या बैठकीत समोर आला किम जोंगचा नवीन अवतार
  • स्लीम आणि फीट किम जोंग उन
  • किम जोंग उनच्या वजनात १९ किलोंची घट

उत्तर कोरिया :

उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन दीर्घकाळानंतर गेल्या आठवड्यात जगासमोर आलाय. किम जोंग उनचा नवा अवतार अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. याचं कारण म्हणजे, ३७ वर्षीय किम जोंग उन यानं अगोदर तुलनेत आपलं वजन खूपच कमी केलंय. त्यामुळे तो फीट आणि स्लीम दिसत होता. त्यामुळे त्याच्या चेहऱ्यातही बराच फरक पडलेला दिसून आला.

उत्तर कोरियाची ‘कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सी‘ (KCNA) द्वारे हा फोटो २८ डिसेंबर २०२१ रोजी जारी करण्यात आला.

गेल्या आठवड्यात पक्षाच्या सेंट्रल कमिटीच्या एका बैठकीत किम जोंग उननं सहभाग नोंदवला. हाच पक्षाच्या हाती उत्तर कोरियाची सत्ता आहे. या दरम्यान किम जोंगनं उपस्थितांसमोर एक लांबलचक भाषणही ठोकलं.

वजन कमी केल्यानंतर असा दिसतोय ‘हुकूमशहा’ किम जोंग उन

कोण आहे ‘बिटकॉईन’चा शोधकर्ता? एलन मस्कनं रहस्यावरून हटवला पडदा…
‘राफेल’चा धसका, पाकची चीनकडून J-10C लढावू विमानांची खरेदी
उत्तर कोरियात परदेशी मीडियावर संपूर्णत: बंदी आहे. त्यामुळे इथल्या फार थोड्या घडामोडी जगापर्यंत सहज पोहचतात. परंतु, ब्रिटनच्या काही वृत्तसंस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, किम जोंग उननं जवळपास १९ किलो वजन घटवलं आहे.

डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला किम जोंगच्या काकांचं निधन झालं. तेदेखील मंत्रिमंडळाचा एक भाग होते. त्यानंतर गेल्या आठवड्यात सेंट्रल कमिटीची ही बैठक पार पडली होती. मात्र, या बैठकीत बऱ्याचदा चर्चेत आलेली किम जोंगची बहिण मात्र दिसली नाही.

north korean leader kim jong un

किम जोंग उन (फाईल फोटो)

Sex Trafficking: अल्पवयीन मुलींचा ‘सेक्स ट्राफिकिंग’साठी वापर, दोषी ब्रिटिश महिलेला कठोर शिक्षा
‘ओमिक्रॉनला घाबरू नका, हा तर केवळ हंगामी सर्दीकारक विषाणू’
खुशखबर! ओमिक्रॉनला रोखणाऱ्या ‘अँटिबॉडीज’चा शोध
अजब-गजब नियम बनवण्यासाठी अनेकदा चर्चेत येणाऱ्या ३७ वर्षीय हुकूमशहा किम जोंगची उंची ५ फूट ७ इंच आहे. त्यामुळे डॉक्टरांनी काही महिन्यांपूर्वी जोंगला वजन घटवण्याचा सल्ला दिला होता.

उल्लेखनीय म्हणजे, उत्तर कोरियातील नागरिक सध्या अन्नपदार्थांचा तुटवड्याच्या संकटाला तोंड देत आहेत. अनेक ठिकाणी नागरिकांनी भूकेनं व्याकूळ होऊन जीव सोडल्याचाही दावा काही वृत्तसंस्थांनी केला आहे. देशात ८ लाख ६० हजार टन अन्नधान्याची कमतरता आहे. सप्टेंबर महिन्यातही अशीच परिस्थिती समोर आल्यानंतर ‘यूनायटेड नेशन्स‘ (UN) नं उत्तर कोरियाला मदत पुरविली होती.

Gen Nadeem Anjum: ना फोटो, ना व्हिडिओ… कुठे गायब झालेत पाकिस्तानी ISI चे नवे प्रमुख अंजुम नदीम!
Asteroid 2017 AE3: वादळी वेगानं लघुग्रह पृथ्वीच्या दिशेनं पुढे सरकतोय, ‘नासा’चा इशाराSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *