उपमुख्यमंत्री होऊनही जिल्हा बँकेची हौस का फिटत नाही?; अजित पवारांनी सांगितलं कारण


हायलाइट्स:

  • पुणे जिल्हा बँक निवडणूक तयारीच्या मेळाव्यात अजित पवारांची फटकेबाजी
  • जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचं सांगितलं कारण
  • माझ्या कामात लुडबूड करू नका; विरोधकांना दिला इशारा

पुणे: जिल्हा मध्वर्ती सहकरी बँकेच्या निवडणुकीचा (Pune District Bank Election) आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या नेहमीच्या स्टाइलनं तुफान फटकेबाजी केली. ‘पक्षानं उपमुख्यमंत्री केलं तरी जिल्हा बँकेची हौस का फिटत नाही, या प्रश्नाचं उत्तरही त्यांनी याच मेळाव्यात दिलं.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तयारीचा अजित पवार यांनी आज आढावा घेतला. बूथनिहाय नेत्यांची जबाबदारी देखील त्यांनी जाहीर केली. ‘बारामतीमधील एका कार्यकर्त्यावर तीन मतं आणून मतदान करून घेण्याची जबाबदारी आहे. मतदान करून घेण्यात कोणीही कमी पडू नका. राष्ट्रवादीने ज्याला मोठं केलं, तो सध्या भाजपमध्ये जाऊन आम्हाला ऐकवत आहे. मात्र या निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची आहे. वडीलधाऱ्यांनी जिल्हा बँकेचे लावलेले रोपटे आपल्याला अजून मजबूत करायचे आहे. बँकांमधील स्पर्धेत जिल्हा सहकारी बँक कोठेही कमी पडता कामा नये. जबाबदार मतदार या नात्याने काही चुकीची गोष्ट समोर आल्यास त्वरित माझ्या नजरेस आणून द्यावी. माझ्या पाठीला डोळे नाहीत, त्यामुळे तुम्हीच मला माहिती द्या, त्यामध्ये लक्ष घालण्यात येईल, असं आश्वासन अजित पवार यांनी यावेळी दिलं.

वाचा: ‘मोदी मास्क लावत नाहीत म्हणून देशातील जनताही मास्क लावत नाही’

उपमुख्यमंत्री केले तरी ह्यांची जिल्हा बँकेची हौस का फिटत नाही, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, असं सांगत अजित पवार यांनी या निवडणुकीत उतरण्याचं कारण सांगितलं. ‘तिथल्या विरोधकांनीच मला सांगितलं, तुम्ही उमेदवार असाल तरच आम्ही बिनविरोध करू. त्यामुळं नाईलाजास्तव मला अर्ज भरावा लागला,’ असं ते म्हणाले. ‘जे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले आहेत, त्यांनी निवडणुकीनंतर माझ्या कामात लुडबूड करायची नाही. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी मदत केलेल्यांची कामे करणार, अशी ग्वाही त्यांनी दिली. इंदापूरच्या जागेबाबत हर्षवर्धन पाटील आणि आप्पासाहेब जगदाळे यांच्याशी चर्चा झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

वाचा: शिक्षक भरती घोटाळा: माजी आमदाराचा फडणवीसांवर गंभीर आरोपSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *