१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त कोविडमुक्तीसाठी शुभेच्छा – ना.डॅा.नीलम गोऱ्हे

१ मे महाराष्ट्र दिनाच्या पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा – कोविडमुक्त महाराष्ट्र आणि भारत देश असेल – ना.डॅा.नीलम गोऱ्हे Best wishes for covidmukti on occasion of 1st May Maharashtra Day – Dr.Neelam Gorhe

१ मे या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा देते. बिकट वाटेवरून आपला मार्ग चालू आहे, कोरोनाच्या परिस्थितीमधल आव्हान विविध मार्गांवरती पेलण्याचं देण्याचं काम आपले राज्य सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करत आहेत. आपण अनेक उपक्रम, अनेक योजना, गेल्या दोन वर्षात राबविण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे, शेतकरी आहेत, कामगार आहेत, घर कामगार आहे, रिक्षावाले यांच्यासाठी सुद्धा मदतीची योजना सरकारने जाहीर केली. इतकेच नव्हे तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा ह्या कोविडच्या कालावधीमध्ये प्रत्येक सेंटर्स सुरक्षित असावे म्हणून सुद्धा SOP’s राज्य सरकारने तयार केलेल्या आहेत.

पुढच्या वर्षासाठी शुभेच्छा देत असताना कोविड पासून मुक्त महाराष्ट्र आणि भारत देश असेल अशा मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते..! आणि आपल्याला सगळ्यांना लस लवकरच मिळणार आहे. ती मिळणे म्हणजे एका अर्थानी आपल्या प्रत्येकाला नवीन आयुष्यासाठी नवसंजीवनी मिळावी यासाठी तुम्ही तरुण असा किंवा वृद्ध असा ते याच्याबद्दल म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देते. ज्यांचं आयुष्य गेल्या वर्षभरामध्ये गमावलेले त्यांना मी अंतकरणापासून श्रद्धांजली अर्पण करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: