‘लोक मोदींचं अनुकरण करतात, ते मास्क लावत नाहीत म्हणून लोकही मास्क लावत नाहीत’


हायलाइट्स:

  • खासदार संजय राऊत यांची जोरदार फटकेबाजी
  • मास्क वापरावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा
  • मोदींनी स्वत:पासून निर्बंधांचं पालन करावं – राऊत

नाशिक: ‘देशाची जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचं ऐकते. मी स्वत: देखील त्यांचं अनुकरण करतो. ते मास्क लावत नाहीत म्हणून आम्हीही मास्क लावत नाहीत. लोकही मास्क लावत नाहीत,’ असं सांगत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

नाशिकमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील करोना स्थितीबाबत बोलताना त्यांनी प्रत्येकाला काळजी घेण्याचं आवाहन केलं. ‘राज्यात सध्या रात्रीच्या वेळेस संचारबंदी लागू झाली आहे, पण दिवसा निर्बंध लावण्याची वेळ येऊ नये असं वाटतं. तसं झाल्यास नोकरी, धंद्यावर संकट येईल. राज्याचं अर्थचक्र थांबेल. तसं होऊ नये असं वाटत असेल तर प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे,’ असं ते म्हणाले.

वाचा: कालीचरण महाराजांना अखेर बेड्या; रायपूर पोलिसांची भल्या पहाटे कारवाई

जनतेला करोनापासून काळजी घेण्याचं आवाहन करताना पंतप्रधान स्वत: मास्क लावत नाहीत याकडं राऊत यांनी यावेळी लक्ष वेधलं. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी मास्क लावा सांगतात, पण ते मास्क लावत नाहीत. मुख्यमंत्री मास्क लावतात, पण देशाचे नेते मोदी आहेत. आपण पंतप्रधानांचं ऐकतो, मी सुद्धा त्यांचं अनुकरण करतो. जागतिक व्यासपीठावरील किंवा देश पातळीवरील कुठल्याही कार्यक्रमात मोदी मास्क लावत नाहीत. म्हणून लोकही लावत नाहीत. लोकांना विचारलं तर ते मोदींकडं बोट दाखवतात. त्यामुळं मोदींनी देखील मास्क वापरायला हवा. त्यांनी स्वत:पासून बंधनांचं पालन करावं, असं राऊत म्हणाले.

वाचा: राज्यपालांच्या नाराजीवर संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे हे संत पुरुष, ते धमकी कसे देतील?

लग्नांमध्ये होणाऱ्या गर्दीचं म्हणाल तर बरीच लग्नं आधीपासून ठरलेली असल्यानं काही बाबतीत नियमांचं उल्लंघन होतं आहे. मात्र, तरीही लोक काळजी घेत आहेत, असंही राऊत यांनी सांगितलं.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *