लग्नसोहळ्यावरुन परतणारी जीप उलटली; अपघातानंतर सारे गाव हळहळले


हायलाइट्स:

  • कन्नड- सिल्लोड महामार्गावर मध्यरात्री अपघात
  • अपघातात दोघांचा जागीच मृत्यू
  • माजी ग्रा.पं.सदस्यासह दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : कन्नड-सिल्लोड राज्य महामार्गावर मंगळवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, यातील एक जण माजी ग्रामपंचायत सदस्य असल्याची माहिती समोर आली आहे. तर आणखी तीन जण जखमी असून त्यांच्यावर सिल्लोड येथील रुग्णालयात उपचार सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री नाशिक येथून लग्नसमारंभ उरकून भराडीतील कुटुंब बोलेरो वाहनाने (एमएच २० बीसी ६६२३) परतत होते. पण रात्री दीडच्या सुमारास कन्नड मोहाडी फाट्याजवळ बोलेरो जीपचा अपघात होऊन जीप उलटली. अपघातानंतर जीप दोन पलट्या घेऊन बाजूच्या शेतात जाऊन थांबली. यात भराडीचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रदीपसिंग सुंदरसिंग गौर (वय ५६) व लता शिवसिंग गौर ( वय ५० ) हे दोघे जागीच ठार झाले. तर रजेशसिंग गोकुळसिंग गौर ( वयं ५० ), शिवसिग सुरजसिंग गौर ( वयं ६५ ), बाबुराव राधासिंग जाधव ( वय३२ ) हे तिघे जखमी झाले आहेत.

वाचाः पैठणच्या धर्मांतर सोहळ्यातील कुटुंबाने केला मोठा खुलासा, अखेर वाद मिटला

अपघाताची माहिती मिळताच पिशोर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक कोमल शिंदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ उपचारासाठी सिल्लोड येथे पाठवले. तर या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून इतर तिघांवर उपचार सुरु आहे. जखमींपैकी दोघांना जबर मार असल्याने गंभीर जखमी झाले आहेत.

वाचाः अखेर ठरलं! मुंबई-पुण्यानंतर ओमिक्रॉन रुग्णांचा अहवाल देणारी लॅब आता ‘या’ जिल्ह्यातही

गावात शोककळा

कन्नड-सिल्लोड महामार्गावर रात्री झालेल्या अपघातात गावातील प्रदीपसिंग सुंदरसिंग गौर आणि लता शिवसिंग गौर जागीच ठार झाले असल्याची बातमी भराडी गावात कळताच भराडीवर शोककळा पसरली. प्रदीपसिंग गौर हे माजी ग्रामपंचायत सदस्य असून गावातील समाजकार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा. त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी कळताच गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

वाचाः धक्कादायक! बाहेरून पोलीस भरती प्रशिक्षण संस्था, आतमध्ये जाताच अधिकारी चक्रावलेSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *