आर्मीचा गणवेश घालून संवेदनशील परिसरात प्रवेश; तोतया अधिकाऱ्याचा काय होता उद्देश?


हायलाइट्स:

  • आर्मीचा गणवेश घालून प्रवेश करण्याचा प्रयत्न
  • देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • तोतया अधिकाऱ्याला अटक

नाशिक : देवळालीच्या आर्टिलरी परिसरात आर्मीचा गणवेश घालून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली आहे. याबाबत देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पवार असं अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव आहे. (Nashik News Updates)

नाशिकचा देवळाली आर्टिलरी परिसर संवेदनशील म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी स्थानिक आर्टिलरी प्रशासन चोख बंदोबस्त ठेवत असते. दरम्यान देवळालीच्या लष्करी भागात एक व्यक्ती आर्मीचा गणवेश परिधान करून फिरताना दिसला होता. तसंच तो लष्करी अधिकारी असल्याची बतावणी करत होता. संशयास्पद हालचालीवरून काही वेळांनंतर याठिकाणी तैनात असणाऱ्या आर्मीच्या जवानांच्या लक्षात ही बाब येताच या तोतया अधिकाऱ्याला जाब विचारण्यात आला. त्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.

Gen Nadeem Anjum: ना फोटो, ना व्हिडिओ… कुठे गायब झालेत पाकिस्तानी ISI चे नवे प्रमुख अंजुम नदीम!

संबंधित तोतया अधिकाऱ्याकडे लष्कराच्या कँटीनचे कार्ड तसंच त्याच्या गाडीवर लष्कराचा लोगोदेखील आढळला आहे.

दरम्यान, या प्रकरणी गणेश पवार याच्या विरोधात देवळाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी करण्यात येत आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *