Omicron: ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट बनणार करोनाचा कर्दनकाळ? तज्ज्ञांकडून आशेचा किरण


हायलाइट्स:

  • ‘ओमिक्रॉनमुळे संपुष्टात येणार करोना’
  • ओमिक्रॉन फैलावतोय परंतु, मृत्यूच्या संख्येत घट
  • ‘ओमिक्रॉन’ करतोय बुस्टर डोसचं काम?
  • मात्र, अगोदरपासून आजारी असणाऱ्या व्यक्तींचा धोका कायम

नवी दिल्ली :

जगभरात सध्या धुमाकूळ घालत असलेला करोनाचा नवा व्हेरियंट ‘ओमिक्रॉन‘ हाच करोनाचा खात्मा करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असा दावा ब्रिटिश मेडिकल काऊन्सिलच्या माजी वैज्ञानिक डॉ. राम एस उपाध्याय यांनी केला आहे.

‘ओमिक्रॉन’नं सध्या युरोप आणि अमेरिकेत अत्यंत वेगानं हातपाय पसरलेत. मात्र, डॉ. उपाध्याय यांच्या मते, ओमिक्रॉन’च्या फैलावण्याच्या वेगाची धास्ती घेण्याची गरज नाही. याच व्हेरियंटमुळे या साथीच्या आजाराचा समूळ नाश होईल. डेल्टाच्या तुलनेत फुफ्फुसात हातपाय पसरण्यासाठी ‘ओमिक्रॉन’ला अधिक वेळ लागतो, अशी माहितीही त्यांनी दिलीय.

डॉ. उपाध्याय यांच्या म्हणण्यानुसार, ओमिक्रॉनचं स्वरुप हे डेल्टापेक्षा खूपच वेगळं आहे. डेल्टा फुफ्फुसात शिरून व्यक्तीला अधिक नुकसान करतो. तर ओमिक्रॉन श्वसन-नलिकेत अडकून आपली संख्या वाढवतो. ओमिक्रॉन फुफ्फुसापर्यंत पोहचतो तेव्हा त्याचा वेग १० टक्क्यांनी कमी होतो. यामुळे रुग्णांना कृत्रिम ऑक्सिजनची गरज भासत नाही.

सावध राहा! जगभरात ओमिक्रॉनची ‘महालाट’, रुग्णसंख्येत ११ टक्क्यांची वाढ
लॉकडाऊन असूनही शहरात करोना फैलावलाचा कसा? अधिकाऱ्यांना फर्मावली शिक्षा!
व्यक्तीच्या श्वसन-नलिकेत ‘म्यूकोसल’ रोगप्रतिकारक प्रणाली कार्यरत असते, हीच प्रणाली रोगप्रतिकारक शक्तीचं केंद्र म्हणून काम करते. या ठिकाणी एक अँटीबॉडी निर्माण होते, याला ‘इम्युनोग्लोबुलिन आयजीए’ म्हटलं जातं. जेव्हा ओमिक्रॉन श्वसन-नलिकेत आपली संख्या वाढवतो, तेव्हा इथं आधीच उपस्थित असलेल्या अँटीबॉडी अधिक वेगाने सक्रिय होतात. सोप्या भाषेत सांगायचं तर, अँटीबॉडी गंभीर धोक्याअगोदरच ‘ओमिक्रॉन’ला नष्ट करू लागतात. त्यामुळे व्यक्तीला गंभीर स्वरुपात आजारी पाडण्याची संधीच विषाणूला मिळत नाही, असं मत डॉ. उपाध्याय यांनी व्यक्त केलंय.

ओमिक्रॉन सध्या तेजीनं डेल्टाची जागा घेत आहे. त्यामुळे रुग्णसंख्याही तेजीनं वाढत आहे. परंतु, यामुळे घाबरण्याची गरज नाही. कारण जितक्या अधिक लोकसंख्येत हा व्हेरियंट फैलावेल तितक्या अधिक लोकांमध्ये नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल.

संक्रमणामुळे जी रोगप्रतिकारशक्ती तयार होते, ती एखाद्या लसीमुळे निर्माण होणाऱ्या रोगप्रतिकारशक्तीच्या तुलनेत अधिक वेळेपर्यंत शरीरात उपस्थित राहते. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरियंट जेवढ्या अधिक वेगानं फैलावेल त्याचा धोका तितकाच कमी होत जाईल आणि याच व्हेरियंटमुळे करोनाचा खात्मा होईल, असं मत डॉ. उपाध्याय यांनी व्यक्त केलंय.

भडकावू भाषणांतून हिंसेचं समर्थन पडलं भारी… धार्मिक स्थळाला टाळं!
बाल्कनीत कपडे सुकवण्यासाठी टाकताय? दंड भरण्यासाठी तयार राहा!Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *