भडकावू भाषणांतून हिंसेचं समर्थन पडलं भारी… धार्मिक स्थळाला टाळं!


हायलाइट्स:

  • फ्रान्समध्ये कट्टरतावादावर प्रहार
  • भाषणांद्वारे समाजात घृणा पसरवण्याचं काम
  • मशिदीला ठोकलं टाळं

पॅरिस, फ्रान्स :

कट्टरतावादावर प्रहार करत धार्मिक स्थळावरून भडकाऊ भाषणांद्वारे घृणा पसरवणाऱ्यांविरोधात सरकारनं कडक पाऊल उचललं आहे. सरकारकडून या धार्मिक स्थळालाच टाळं ठोकण्यात आलंय. ही घटना फ्रान्समध्ये घडलीय.

अनेक वर्षांपासून इस्लामिक कट्टरतेचा सामना फ्रान्सला करावा लागत आहे. देशाच्या उत्तर भागात स्थित एका मशिदीतील इमामानं आपल्या भाषणात घृणा पसरवण्याचा प्रयत्न केला तसंच जिहादचं समर्थन केलं, असा आरोप ठेवण्यात आला आहे.

ही मशिद राजधानी पॅरिसपासन जवळपास १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेवैस भागात स्थित आहे. कारवाईनंतर ही मशिद पुढील सहा महिन्यांसाठी बंद राहणार आहे.

घृणा आणि हिंसा भडकावण्याचं काम इमामनं आपल्या भाषणात केल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. ख्रिश्चन, समलैंगिक आणि यहुदी यांच्याविरुद्ध भावना भडकावण्याचा काम इमाम आपल्या भाषणातून करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

हरिद्वार धर्मसंसद ‘हेट स्पीच’ प्रकरण : पाकिस्तानचा भारत सरकारवर निशाणा
लुधियाना कोर्ट बॉम्बस्फोट : मास्टरमाईंड जसविंदर सिंहला जर्मनीत अटक
जिहाद हेच काम असल्याचं इमामचं म्हणणं आहे. जिहादसाठी लढणाऱ्यांना ‘हिरो’ तर गैर-मुस्लीम ‘शत्रू’ असल्याचं सांगत इमाम हिंसा पसरवत असल्याचंही अधिकाऱ्यांनी म्हटलंय.

उल्लेखनीय म्हणजे, संबंधित मशिद बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचं सूतोवाच गृहमंत्री गेराल्ड डारमिनन यांनी दोन आठवड्यांपूर्वी केलं होतं.

स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मशिदीच्या इमामानं नुकताच इस्लाम धर्माचा स्वीकार केला होता.

दुसरीकडे, मशिदीची देखभाल करणाऱ्या संघटनेनं न्यायालयात या निर्णयाविरोधात दाद मागण्याची भूमिका घेतलीय. तसंच आरोप ठेवण्यात आलेला इमाम कधीकधी या मशिदीत भाषण देत होता, सध्या त्याला निलंबित करण्यात आल्याचंही संघटनेनं म्हटलंय.

बाल्कनीत कपडे सुकवण्यासाठी टाकताय? दंड भरण्यासाठी तयार राहा!
Emergency landing: हवेतच विमानावर कोसळला बर्फाचा तुकडा, ‘विंडस्क्रीन’ला तडा आणि…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *