बीडमध्ये मोठी कारवाई; भाजप जिल्हाध्यक्षाच्या जागेत असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड


हायलाइट्स:

  • बीड जिल्ह्यात जुगार अड्ड्यावर धाड
  • भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांची जागा असल्याचा संशय
  • पोलिसांनी केली कारवाई

बीडः बीड शहरालगत असलेल्या चराटा फाटाजवळ एका मोठा जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी रात्री मोठी धाड टाकली असून यामध्ये ४७ जुगाऱ्यांसह पंचवीस ते तीस फोर व्हीलर व टू व्हीलर आणि लाखोंचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.

शहरापासून जवळच असलेल्या चराटा फाटा रोडवर एक आलिशान जुगार अड्डा असल्याची पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रात्री उशिरा एसकोर्टक्लबवर धाड टाकली असता यामध्ये ४७ जुगारी २५ ते ३० आलिशान फोर व्हीलर, टू व्हीलर व महागडे मोबाईल आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त केला आहे. हा क्लब सावंत आणि घोडके या नावाचे दोन व्यक्ती चालवत असल्याची माहिती पोलिसांना सूत्राद्वारे मिळाली होती. त्यानंतर रात्री उशिरा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने या क्लबवर धाड टाकली.

वाचाः धक्कादायक! बालकांच्या पोषण आहारात सापडला मेलेला उंदीर; पालकांमध्ये संताप

गुप्त खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी या आलिशान जुगार अड्ड्यावर धाड टाकली होती. मात्र त्यालाही राजकीय सपोर्ट असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र आता ही कारवाई कशा पद्धतीने पुढे होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या जुगाराची जागा भाजप जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मालकीची असल्याची माहिती समोर आलं आहे.

वाचाः अखेर ठरलं! मुंबई-पुण्यानंतर ओमिक्रॉन रुग्णांचा अहवाल देणारी लॅब आता ‘या’ जिल्ह्यातही

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी अनेक गुटख्यांच्या व दारू जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकून अनेक जुगारी गुटखा विक्रेते दारू विक्रेते ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली. गेल्या काही दिवसांपूर्वीच शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यावरही गुटखा प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली होती.

वाचाः तुळजापुरात २ दुकानांना भीषण आग, लाखोंचा माल आगीत जळून खाकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *