Breaking : तुळजापुरात २ दुकानांना भीषण आग, लाखोंचा माल आगीत जळून खाक


उस्मानाबाद : तुळजापूर शहरातील चेतना वाईन शॉप शेजारील चप्पल दुकान, मसाले दुकानला रात्री अचानक शॉट सर्किटमुळे आग लागली यात दोन्ही दुकाने जळून राख झाली असून दोन्ही दुकानातील लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

शहरातील जुने बस स्टॅन्ड भवानी रोडवरील मुरली गौडा यांचे किंग्ज स्टार बिअर शॉपी आहे, तर शांतिलाल गाटे यांचे रॉयल चप्पल दुकान आहे. काल मध्यरात्री इलेक्ट्रिक वायरचा शॉट सर्किट झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. दोन्ही दुकानातील लाखो रुपयांचा माल या आगीत जळाला आहे.

वीजबिल वसुलीसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, या शहरांमध्ये होणार कारवाई
नगर परिषदचे अग्निशमन वाहनाने आग विझवण्याचा प्रयत्न झाला. परंतु, आग एवढी तिव्र होती की काही क्षणात दुकानातील सर्व माल जळून गेला. शेजारील सर्व दुकाने सुरक्षित आहेत. पोलिसांनी लाईनमनला बोलावून शेजारील दुकानचा विद्युत प्रवाह खंडीत करुन टाकला. नगर परिषद कर्मचारी पोलीस निरिक्षक अजिनाथ काशिद स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.

अखेर ठरलं! मुंबई-पुण्यानंतर ओमिक्रॉन रुग्णांचा अहवाल देणारी लॅब आता ‘या’ जिल्ह्यातहीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *