Nitesh Rane : नितेश राणेंना ‘बेल की जेल?’, उद्या फैसला, कोर्टात काय काय घडलं?


सिंधुदुर्ग : संतोष परब हल्लाप्रकरणात अटकेची टांगती तलवार असलेले भाजप आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या पुन्हा सिंधुदुर्ग कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे नितेश राणे यांना ‘जेल की बेल?’, याचा फैसला उद्याच होणार आहे. आज नितेश राणे यांचे वकील अ‍ॅडव्होकेट संग्राम देसाई आणि सरकारी वकील अॅडव्होकेट प्रदीप घरत यांनी दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तीवाद केला. साडेसहा वाजता न्यायालयाची वेळ संपली. संग्राम देसाई यांनी पुन्हा १० मिनिटांची वेळ वाढविण्याची न्यायाधीशांकडे विनंती केली. १० मिनिटे पुन्हा युक्तीवाद झाल्यानंतर कोर्टाने उद्या पुन्हा सुनावणी होणार असल्याचं सांगितलं.

नितेश राणे यांचे वकील अ‍ॅडव्होकेट संग्राम देसाई यांनी कोर्टाकडे अंतरिम जामिनाची मागणी केली होती. मात्र अंतरिम जामीनाची मागणी कोर्टाने नाकारली आहे. नितेश राणे यांना दिलासा देण्यास सिंधुदुर्ग कोर्टाने नकार दिला आहे.

नितेश राणे यांचे वकील अॅड संग्राम देसाई यांनी कोर्टात काय युक्तीवाद केला?

 • कुठलंही सर्च वॉरंट नसताना नितेश राणेंची रुग्णालयात झडती का घेतली?
 • नितेश राणे यांची काल घेतलेली नोटीस चुकीची
 • सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे
 • फिर्यादीचा सत्कार अजित पवारांकडून कसा केला गेला?
 • हल्ल्यातील संशयितांची नावे गुप्त का ठेवली जात आहेत?
 • संशयितांची नावे गुप्त तर मग नितेश राणे, गोट्या सावंतांना नोटीस बजावल्याचं पोलिसांनी मीडियाला का सांगितलं?
 • राग मनात ठेऊन नितेश राणेंना या केसमध्ये अडकविण्याचा प्रयत्न
 • नितेश राणे आणि आरोपी सचिन सातपुतेचा सीडीआर पोलिसांना मिळालाय
 • सर्व गोष्टी पोलिसांना सापडलेल्या असताना आरोपींची समोरासमोर चौकशी कशाला?
 • हल्ल्यानंतर आरोपीनं फोनवरुन संपर्क साधल्याचं फिर्यादीचं म्हणणं आहे.
 • मात्र कोणता आरोपी भररस्त्यात फोन करेल?
 • इथूनच या सर्व प्रकरणात संशय येत आहे.
 • इथूनच या सर्व प्रकरणात संशय येत आहे.
 • दोन ते तीन दिवसांत निवडणूक होत आहे, त्यामुळे कोर्टाने अंतरिम जामीन द्यावा

विधानभवनाच्या पायऱ्यांवर जे झालं त्याचा राग काढला जात आहे
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी कोणता युक्तीवाद केला?

 • विधान भवनातल्या पायऱ्यांवर काय घडलं, त्याचा कोर्टात काय संबंध
 • पोलिसांविरोधात तक्रार नसल्याचं सांगता मग पोलिसांवर दबाव आहे असं का बोलता
 • पोलिसांवरुन तुमच्या दोन वेगवेगळ्या भूमिका का
 • सुप्रीम कोर्टानुसार दखलपात्र गुन्हा असेल तर तक्रार ताबडतोब झाली पाहिजे
 • सातपुते हा स्वाभिमानीचा कार्यकर्ता होता, नंतर त्याने भाजपत प्रवेश केला
 • आरोपी सर्व लोकांसमोर चाकूने हल्ला करतात, मग नितेश राणे-गोट्या सावंत यांना फोनवरुन हल्ला केल्याचं का सांगू शकत नाही
 • आमच्या मागे मोठे हात आहेत, असं आरोपींना सुचवायचं असेलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *