‘या’ भाजप आमदाराच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी युवक चढला ‘टॉवर’वर


हायलाइट्स:

  • औरंगाबादमध्ये युवकाचे शोले स्टाईल आंदोलन
  • भाजप आमदाराच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन

औरंगाबादः औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील तहसील कार्यालयातील टॉवर आज सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास एक युवक चढवून बसल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. भाजपच्या एका आमदाराच्या राजीनाम्याची मागणी करत टॉवरवर चढलेल्या या तरुणाला अनेकदा विनंती करूनही तो खाली उतरण्यास तयार नव्हता, अखेर पोलिसांनी त्याची समज काढत खाली उतरवलं.

मंगळवारी सकाळी संभाजी भोसले नावाचा व्यक्ती औरंगाबाद तहसील कार्यालयातील टॉवर चढून बसला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि अग्निशमन दलाची गाडी सुद्धा प्रशासनाकडून तैनात करण्यात आली होती. तर भाजप आमदार अतुल सावे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी युवकाचे शोले स्टाईल आंदोलन केले. सावे यांनी मोठा भ्रष्टाचार केला असून, अधिवेशनात त्यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी या तरुणाने केली.

वाचाः पैठणच्या धर्मांतर सोहळ्यात आता नवा ट्विस्ट; ब्राह्मण सभेचे अध्यक्षांनी केला ‘हा’ दावा

चार तास टॉवरवर…

सकाळी ९ वाजेच्या सुमारास टॉवरवर चढलेला हा तरुण तब्बल चार तास टॉवरवर बसून होता. यावेळी पोलिसांकडून त्याला अनेकदा खाली उतरण्याची विनंती करण्यात आली. मात्र हा तरुण आयकाला तयार नव्हता. त्यामुळे तब्बल चार तासांनी त्याची समजूत काढण्यास पोलिसांना यश आले.

वाचाः शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी; औरंगाबाद जिल्ह्यात गारांचा पाऊस

वाचाः अखेर मानवीच्या अपहरणाचे गुढ उकलले; घरासमोर खेळत असताना झाली होती बेपत्ताSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *