पिस्तुल, तलवार आणि रॉड… रोहिणी खडसे यांनी सांगितली आपबिती


हायलाइट्स:

  • प्राणघातक हल्ल्यावर रोहिणी खडसे यांची पहिली प्रतिक्रिया
  • शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हल्ला केल्याचा थेट आरोप
  • रोहिणी खडसे यांनी काही लोकांची नावंही सांगितली!

किशोर पाटील । जळगाव

जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यावरील हल्ल्यामुळं जळगावातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सर्व पक्षीयांनी या हल्ल्याचा निषेध केला असला तरी स्वत:वरील हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसे यांनी थेट शिवसेनेकडं बोट दाखवलं आहे.

रोहिणी खडसे या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मानेगाववरून मुक्ताईनगरकडे येत असताना एमएच १९ सीसी-१९१९ या क्रमांकाच्या त्यांच्या कारवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केला. यावेळी कारमध्ये रोहिणी खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक पांडुरंग नाफडे आणि गाडीचा चालक होता. या हल्ल्यात रोहिणी खडसे यांना सुदैवाने कसलीही दुखापत झालेली नाही. हल्ला केल्यानंतर काही क्षणातच हल्लेखोर फरार झाले.

वाचा: रोहिणी खडसेंच्या कारवर हल्ला; मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले…

रोहिणी खडसे यांनी स्वत: याबाबत आज प्रतिक्रिया दिली. ‘तीन दुचाकीवरून सात जण आले होते. यातील तिघे शिवसेनेचे पदाधिकारी होते. एकाच्या हातात पिस्तूल, एकाच्या हातात तलवार तर तिसऱ्याच्या हातात लोखंडी रॉड होता. त्यातील एकानं मी कारमध्ये बसलेल्या बाजूने माझ्यावर पिस्तूल रोखले व कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र दरवाजा उघडला नाही म्हणून हातात रॉड असलेल्या व्यक्तीने काचेवर जोराने हल्ला चढविला, असं त्या म्हणाल्या. ‘मला मारण्यासाठीच हे तिघेजण आले होते. हा हल्ला मला घाबरविण्यासाठी होता. मात्र मी घाबरणारी नाही. मी महिलांच्या पाठीशी आहे. बोदवड नगरपंचायतीपासून सुरू झालेल्या वादातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी हा हल्ला केला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला.

वाचा: मी गावभर हिंडतो, चार चार दिवस घराबाहेर असतो, पण…: शरद पवार

हल्ला करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची नावंही रोहिणी खडसे खेवलकर यांनी सांगितली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांमध्ये सुनील पाटील, पंकज कोळी व छोटू भोई हे तिघे होते. त्यामुळं या प्रकरणी आता पोलीस काय कारवाई करतात व याचे राजकीय पडसाद काय उमटतात, याकडं लक्ष लागलं आहे.

वाचा: अत्यंत दु्र्दैवी! रस्त्यावर उभा असलेला ट्रक अचानक मागे आला आणि…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *