‘मी गावभर हिंडतो, चार चार दिवस घराबाहेर असतो, पण…’


हायलाइट्स:

  • शरद पवारांच्या हस्ते कोरेगावात शाळेच्या नुतनीकृत वास्तूचं उद्घाटन
  • शरद पवारांनी आपल्या भाषणात केला स्त्री शक्तीचा गौरव
  • मुलांच्या शिक्षणाबाबत तडजोड न करण्याचं केलं आवाहन

सचिन जाधव । सातारा

‘मी गावभर हिंडत असतो. चार चार दिवस घराच्या बाहेर असतो. मात्र, माझी पत्नी माझं घर चांगलं सांभाळते. त्यामुळं स्त्रियांना प्रोत्साहित केलं पाहिजे. शिक्षणामुळं स्त्री कर्तृत्ववान होते आणि स्त्री कर्तृत्ववान असेल तर संपूर्ण घर कर्तृत्ववान होते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्त्रीशक्तीचा गौरव केला.

सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या शरद पवार यांनी सोमवारी कोरेगांव तालुक्यातील करंजकोप इथं सौ. शारदाबाई गोविंदराव पवार या विद्यालयाच्या नुतन वास्तूचं उद्घाटन केलं. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना शरद पवार यांनी महिलांच्या क्षमतेचा व कर्तृत्वाचा गौरव केला.

वाचा: राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; शरद पवार म्हणाले…

‘राज्यामध्ये सत्तेत असताना मी सक्तीनं कायदा करून शिक्षणात तसेच ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती यांसारख्या ठिकाणी महिलांना सत्तेत वाटा द्यायचा निर्णय घेतला. यामुळेच आता ५० टक्क्यापेक्षा जास्त ठिकाणी महिला गावचा कारभार उत्तम रितीने करत आहेत. केंद्रात यूपीएचं सरकार असताना मुलींना सैन्यात ११ टक्के जबाबदारी देण्यात यावी, अशी सूचना मी केली होती. त्याचमुळे आता सैन्यात मुलींची भरती होत असते आणि याचा परिणाम म्हणजे ग्रामीण भागातील मुलींमध्ये या शिक्षणाचं महत्त्व दिसून येत आहे, असंही त्यांनी सांगितलं. कर्मवीर अण्णा आणि आमच्या कुटुंबाचे सलोख्याचे संबंध होते. आण्णांचा विचार घेऊन पुढची पिढी शिकली पाहिजे यासाठी प्रयत्न केले. घर चालवत असताना आईने कधी शिक्षण सोडले नाही. केवळ आईचा आग्रह आणि प्रयत्नांमुळेच आम्ही शिकलो. मुलगी शिकली की घर पुढे जाते. त्यामुळं मुलांच्या शिक्षणात कोणतीही तडजोड करू नका, असा वडिलकीचा सल्लाही शरद पवारांनी यावेळी दिला.

वाचा: अत्यंत दु्र्दैवी! रस्त्यावर उभा असलेला ट्रक अचानक मागे आला आणि…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *