तालिबान्यांवर टीका करताना जिनांबद्दल पाकिस्तानचे मंत्री म्हणतात…


हायलाइट्स:

  • तालिबानकडून अफगाणिस्तानातील महिलांवर अनेक प्रकारच्या बंदी लागू
  • पाकिस्तान मंत्र्यांकडून तालिबानच्या निर्णयावर टीका
  • ‘जिना आणि कवी मोहम्मद इक्बाल यांच्या कल्पनेहून आजचा पाकिस्तान वेगळा’

इस्लामाबाद, पाकिस्तान :

अफगाणिस्तानातील तालिबान सरकारनं आपल्या शिकवणुकीप्रमाणे महिलांना वेगवेगळ्या प्रकारच्या धार्मिक बंधनांत अडकवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यातच त्यांनी महिलांच्या प्रवासावरदेखील बंदी घातलीय. यावरून पाकिस्तानचे सूचना मंत्री फवाद चौधरी यांनी तालिबानवर टीका केलीय. हे एक ‘रुढीवादी पाऊल‘ असल्याचं मत चौधरी यांनी व्यक्त केलंय.

पाकिस्तानबद्दलची चिंता व्यक्त

तालिबानच्या महिलांच्या प्रवासावरच्या बंदीच्या निर्णयावर टीका करताना पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी अशा पद्धतीची विचारसरणी पाकिस्तानसाठी धोकादायक असल्याचं वक्तव्य केलंय.

‘महिला एकट्या प्रवास करू शकत नाहीत किंवा शाळा-कॉलेजात (एकट्यानं) जाऊ शकत नाहीत, अशा प्रकारची रूढीवादी विचारसरणी पाकिस्तानसाठी धोकादायक आहे. पाकिस्ताननं स्वत:च्या प्रगतीचा मार्ग तयार करायला हवा’ अशी गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांना त्यांनी यावेली श्रद्धांजली वाहिली. पाकिस्तानची निर्मिती अल्पसंख्याकांच्या हिताच्या रक्षणासाठी झाली आहे. पाकिस्तान हे धार्मिक राष्ट्र व्हावं अशी जिना यांचीही इच्छा नव्हती. जिना आणि कवी मोहम्मद इक्बाल यांनी ज्या पाकिस्तानची कल्पना केली त्यापेक्षा आजचा पाकिस्तान खूपच वेगळा असल्याचंही मत चौधरी यांनी व्यक्त केलं.

पाकिस्तानवर सनातनी विचारसरणी हावी झाली आणि त्यामुळे पाकिस्तानचं पतन झालं. रुढीवादी विचारांविरुद्धचा हा लढा पाकिस्तानच्या अस्तित्वासाठी महत्त्वाचा आहे आणि हा लढा जिंकूनच आपण किंवा इतर कोणत्याही देशापुढे जाऊ शकतो, असं मतही चौधरी यांनी व्यक्त केलं.

हरिद्वार धर्मसंसद ‘हेट स्पीच’ प्रकरण : पाकिस्तानचा भारत सरकारवर निशाणा
प्रवासासाठी महिलांना हिजाब – पुरुषाची सोबत अनिवार्य; तालिबानी फर्मान

तालिबानकडून महिला ‘बंदिस्त’!

अफगाणिस्तानात सत्ता काबिज करणाऱ्या तालिबाननं महिलांना प्रवासासाठी नवी अट समोर ठेवलीय. यानुसार, महिलांना सार्वजनिक बस किंवा इतर वाहनांतून दूरवरचा प्रवास एकट्यानं करण्यावर बंदी घालण्यात आलीय. तालिबानच्या नव्या फर्मानानुसार, महिलांना प्रवासादरम्यान हिजाब परिधान करणं अनिवार्य असेल. ७० किलोमीटरहून अधिक दूरवरचा प्रवास महिलांनी एकट्यानं करता कामा नये. यासाठी त्यांच्यासोबत एखादा ‘पुरुष संरक्षक’ असणं गरजेचं असेल. अन्यथा अशा महिलांना गाडीमध्ये प्रवेश दिला जाऊ नये. हिजाब परिधान करणाऱ्या महिलांनाच ७० किलोमीटरहून अधिक प्रवासासाठी परवानगी दिली जावी. इतकंच नाही तर, आपल्या मालकीच्या गाडीतही म्युझिक वाजवण्यावर तालिबाननं बंदी जाहीर केली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, यापूर्वी तालिबानकडून मुलींच्या शिक्षणावरदेखील अनेक प्रकारची बंधनं जाहीर करण्यात आलेली आहेत.

क्वीन एलिझाबेथच्या हत्येसाठी महालात घुसलेल्या भारतीयाला अटक
‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगांची २०२२ सालासाठी भविष्यवाणी; नवा व्हायरस, त्सुनामी, एलियन हल्ला आणि बरंच काही…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *