साताऱ्यात भयंकर अपघात; दारूड्या कारचालकाने सहा गाड्यांना दिली धडक, चार जखमी


सचिन जाधव । सातारा

मद्यधुंद कार चालकाने रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने कार चालवून राजपथावर दोन दुचाकी, चार चारचाकी व एका पादचार्‍याला धडक दिली. यात तीन ते चार लोक जखमी झाले असून संतप्त जमावाने दारूड्या कारचालकाला बेदम चोप दिला आहे. दरम्यान, या थरारक घटनेने राजपथावर खळबळ उडाली.

वाचा: राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता; शरद पवार म्हणाले…

सोमवारी रात्री नऊच्या सुमारास सातार्‍यातील शाहू चौक ते रेमंड शॉपी (तालीम संघ) या मार्गावर मद्यधुंद कारचालकाने बेफाम गाडी चालवली. भरधाव वेगातील या कारने प्रथम दत्त मंदिराजवळ एका दुचाकीस्वाराला धडक दिली. ही धडक बसल्याने दुचाकीस्वार सुमारे २५ फूट फरफटत गेला. त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. यानंतर कार चालकाने वेगात पुढे जाऊन दोन चारचाकी वाहनांना व एका पादचार्‍यालाही धडक दिली. यावेळी स्थानिक नागरिक व काही वाहनचालकांनी मद्यधुंद कार चालकाचा पाठलाग केला. एका चारचाकी गाडीला ठोकरल्यानंतर ही कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन धडकली. संतप्त जमावाने या चालकाला बाहेर खेचून बेदम चोप दिला. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बघ्यांची तोबा गर्दी झाली होती. या ठिकाणी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. पोलिसांनी संबंधित कार चालकाला ताब्यात घेऊन जमावाला शांत केले. त्यानंतर हे सर्व प्रकरण पोलिस ठाण्यात पोहोचले असून रात्री उशिरापर्यंत या घटनेची नोंद झाली नव्हती.

वाचा: रोहिणी खडसेंच्या कारवर हल्ला; मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *