संयुक्त महाराष्ट्रासाठी कुर्डुवाडीचे योगदान Kurduwadis contribution to a sanyukta Maharashtra
स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त केली
कुर्डुवाडी/ राहुल धोका - संयुक्त महाराष्ट्र राज्या च्या स्थापनेसाठी कुर्डुवाडी येथे १९५६ साली सोलापुर जिल्हयातील पहिली संयुक्त महाराष्ट्र परिषदेची बैठक झाली. त्यावेळी संयुक्त महाराष्ट्र चळवळीसाठी कुर्डुवाडीतील १५ पैकी ८ सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त झाली .
मुंबई गोळीबारात कुर्डुवाडीतील नागरिक झाले हुतात्मे
डाॅ विलास मेहता यांनी प्रतिनिधीशी बोलताना आठवणीला उजाळा दिला.एम.आय मेहता ,दामु अन्ना मराळ,गेणबा पवार,मोतीकाका मोडनिंबकर, भानदास पवार,शंकर टोणपे,लिंबा गवळी,बाबुराव गोरे,दिंगबर कोळी,एकनाथ मराळ,जयकुमार शहा, चंद्रकांत शहा, दिनदयाळ वर्मा, शेकाप , जनता आघाडी,राष्ट्र सेवा दल ,नॅशनल मजदुर युनियन यांनी पुढाकार घेतला होता.मुंबई गोळीबारात १०५ हुतात्मा झाले यात कुर्डुवाडी येथील नागरिक हुतात्मा झाले.पंतप्रधान नेहरु प्रतापगडावर आले तेव्हा प्रतापगडपासून वाईपर्यंत आंदोलक उभा होते. यात कुर्डुवाडीचे नागरीकही सहभागी झाले होते.त्या आंदोलनासाठी तत्कालीन केंद्रिय अर्थमंत्री चिंतामणी देशमुख यांनी राजीनामा दिल्याची आठवणी डाॅ विलास मेहता सांगत होते, त्यावेळी त्यांचा आवाज आणि उत्साह आजही तरुणांना लाजविणारा होता.