पुण्यात रामदास आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांविषयी केलं मोठं वक्तव्य


हायलाइट्स:

  • शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात रामदास आठवलेंची महत्त्वपूर्ण बैठक
  • नागरिकांनी गर्दी न करण्याचं आवाहन
  • रिपब्लिकन ऐक्याविषयीही केलं भाष्य

पुणे : कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी ‘शौर्य दिवस’ साजरा केला जातो. या दिवशी विजयस्तंभाला वंदन करण्यासाठी राज्यभरातून लोक येत असतात. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पुणे येथील जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित अधिकाऱ्यांची नियोजन बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर आठवले यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी नागरिकांनी गर्दी करू नये, असं आवाहन यावेळी आठवले यांनी केलं. तसंच रिपब्लिकन ऐक्याविषयीही त्यांनी भाष्य केलं आहे. (Ramdas Athavale Pune)

रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर या दोन नेत्यांमध्ये अनेक वेळा राजकीय संघर्ष होताना पाहायला मिळतो. मात्र आज आठवले यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.’जेष्ठ नेते जोगेंद्र कवाडे यांनी प्रकाश आंबेडकर यांना बाजूला ठेवून रिपब्लिकन ऐक्य होऊ शकते, असं मत व्यक्त केलं आहे. मात्र, प्रकाश आंबेडकर यांना बरोबर न घेता रिपब्लिकन ऐक्य होऊ शकणार नाही,’ असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

Breaking:देवेंद्र फडणवीसांनी फिरवला फोन; नितेश राणेंचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

‘कोरेगाव भीमा इथं २०१८ मध्ये झालेल्या संघर्षानंतर कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार आहे; तसंच कोरेगाव भीमा विजय स्तंभ येथे पोलीस मानवंदना द्यावी, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार आहे,’ असं या पत्रकार परिषदेत रामदास आठवले यांनी सांगितलं आहे.

‘विजयस्तंभ परिसराचा सुमारे १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी असलेली सुमारे २० हेक्टर म्हणजे ५० एकर जमिनीचे भूसंपादन करावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना केली आहे. संबंधित जमीन मालकांना दुसऱ्या ठिकाणी जमीन द्यावी, असंही सुचवलं आहे. राज्याचा पर्यटन विभाग आणि केंद्रीय पुरातत्त्व विभाग यांच्याकडूनही या परिसराच्या विकासासाठी निधी मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याद्वारे या ठिकाणी भव्य स्मारक उभे राहू शकेल,’ अशी माहितीही यावेळी आठवले यांनी दिली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *