Aurangabad: माझ्या पत्नीला पाहून का हसतो म्हणताच, डोक्यात घातला….


औरंगाबाद : क्षुल्लक कारणावरून झालेल्या बाचाबाची नंतर तिघांनी आधी शिवीगाळ केली आणि त्यानंतर एकाने ४७ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात घरासमोर पडलेल्या फरशीचा तुकडा उचलून मारल्याने तो व्यक्ती जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर आपल्याला झालेल्या मारहाण प्रकरणी मुकुंदवाडी येथे राहणाऱ्या ४७ व्यक्तीने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

मारहाण झालेल्या व्यक्तीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार,२६ डिसेंबर (रविवार) रोजी रात्री ०८.३० वाजता मुकुंदवाडी भाजीमंडी येथून भाजीपाला घेऊन आपल्या घरी आले असता, घराचे समोर कृष्णा हरिभाऊ शेळके, कचरु देवीदास देहाडे आणि रामेश्वर शेनगावकर हे तिघे जण उभे होते. दरम्यान घरात जाण्यासाठी या व्यक्तीने आपल्या घराचा दरवाजा वाजवला असता, पत्नीने घऱाचा दरवाजा उघडला. मात्र याचवेळी वरील तिघेही व्यक्ती या दाम्पत्याला बघून हसत होते. तेव्हा पतीने तुम्हाला हसायला काय झाले? असे विचारताच तिघांनी त्याला शिवीगाळ देणे सुरु केली, तर यातील कृष्णा शेळके याने पती-पत्नी उभे असताना पतीला घरासमोर पडलेल्या फरशीचा तुकडा उचलून त्यांच्या कपाळावर डाव्या डोळ्याच्या वरती मारली.

फरशीचा तुकडा लागल्याने पतीच्या डोक्यातून रक्त येऊ लागले, तर रक्त पाहून पत्नीही घाबरली. डोक्याला जखम झाल्याचे पाहताच याचवेळी वरील तिघांनी तेथून पळ काढला. त्यानंतर पतीला तिच्या पत्नीने खाजगी रुग्णालयात नेऊन उपचार केले, त्यानंतर पती-पत्नीने पोलीस ठाणे गाठत मारहाण करणाऱ्या तिघांच्या विरोधात तक्रार केली. तर याच तक्रारीवरून मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *