Omicron Variant : राज्यातील ‘या’ शाळेत करोनाचा विस्फोट कायम; प्रशासनाची डोकेदुखी वाढली!


हायलाइट्स:

  • शाळेत करोनाचा वेगाने प्रसार
  • पुन्हा वाढली रुग्णसंख्या
  • ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचा संशय

अहमदनगर : पारनेरमधील जवाहर नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांना झालेल्या समूह करोना संसर्गामुळे अहमदनगर जिल्ह्याची चिंता वाढली. पाच दिवसांत ८२ विद्यार्थ्यांना संसर्ग झाला आहे. ही बातमी येत नाही तोच आता या संसर्गाचा वेग जास्त असल्याने या विद्यार्थ्यांना ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा (Omicron Variant) संसर्ग तर झाला नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. (Coronavirus In School)

जिल्हा रुग्णालयातून संसर्ग झालेल्यांपैकी ६६ विद्यार्थ्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचा अहवाल दोन दिवसांत अपेक्षित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी दिली.

covid vaccination : लसीकरणासाठी केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी; मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना…

जवाहर नवोदय विद्यालयात राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी आहेत. त्यामुळे संसर्गाला नेमकी सुरुवात कुठून झाली आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात संसर्ग झाल्याने ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग तर नाही ना, याची खात्री जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. त्यासाठी संसर्गामधील काही नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.

दरम्यान, जवाहर नवोदय विद्यालयाचा परिसर प्रतिबंध क्षेत्र घोषित करण्यात आला आहे. तेथील सर्व कार्यवाही जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली होत आहेत. विद्यार्थ्यांना वैद्यकीय सुविधांपासून ते प्राथमिक सुविधांपर्यंत सर्व काही जिल्हा प्रशासनाकडून पुरवण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, तहसीलदार शिवपुत्र आवळकंठे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *