भुसावळमधील ‘त्या’ खुनाचा वर्षभरानंतर छडा; समोर आलं धक्कादायक सत्य


हायलाइट्स:

  • भुसावळमधील दारूड्याच्या खुनाचा वर्षभरानंतर छडा
  • वैद्यकीय अहवालानंतर खून झाल्याचं आलं समोर
  • मारहाणीला कंटाळून पत्नीनंच खून केल्याचं निष्पन्न

प्रविण चौधरी । जळगाव

मद्यपी पतीकडून सतत होणारी मारहाण व शिविगाळीला कंटाळून विवाहितेने पतीचा खून केल्याची घटना भुसावळातील लक्ष्मी नारायण नगरमध्ये घडली. विशेष म्हणजे तब्बल एक वर्षाने पोलिस तपासात खून करणारी पत्नीच असल्याचे निष्पन्न झाले आहे. गणेश प्रभाकर महाजन (५०, रा. लक्ष्मी नारायण नगर, हनुमान मंदिरामागे, भुसावळ) असे मृत पतीचे नाव आहे. तर संशयित पत्नी सीमा महाजन (वय ४६) हिने त्यांचा दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाल्याने तिला अटक करण्यात आली आहे.

वाचा: पोलीस-आरोपींमध्ये सिनेस्टाइल चकमक! पोलीस आयुक्तांनी झाड उचलून आरोपींवर फेकले?

गणेश महाजन आणि सीमा महाजन हे भुसावळातील लक्ष्मी नारायण नगरात वास्तव्याला होते. गणेश महाजन याला दारूचे व्यसन जडले होते. त्यामुळे दररोज दारू पिऊन घरी आल्यावर पत्नीशी वाद घालणे व मारहाण करणे हे नित्याचेच झाले होते. ४ ऑगस्ट २०२० रोजी रात्री ७ वाजता नेहमीप्रमाणे गणेश दारू पिऊन घरी आला. त्यावरून पती-पत्नीचे जोरदार भांडण सुरू झाले. संतापाच्या भरात सीमा महाजन हिने नायलॉनची दोरी गणेशच्या गळ्याभोवती आवळून त्याचा खून केला. त्यानंतर पुरावे नष्ट करून त्याने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. पोलिसांना देखील सुरुवातीला संशय न आल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

वाचा: राज्यात इन्कम टॅक्सच्या धाडी; एकाच वेळी पोहोचले १७५ अधिकारी, पैसे मोजण्यासाठी लागले १२ तास

मात्र, डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे या गुन्ह्यातील वैद्यकीय अधिकारी यांचा अभिप्राय, आरोपी व साक्षीदार यांच्या चौकशीची कागदपत्रे येताच त्यांनी ही आत्महत्या नसून खून असल्याचा संशय व्यक्त केला. त्यानतंर संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली. पोलिसांच्या अधिक तपासात अखेर हा खून असल्याचे तसेच तो मृत महाजन यांच्या पत्नीनेच केल्याचे निष्पन्न झाले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *