‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगांची २०२२ सालासाठी भविष्यवाणी; नवा व्हायरस, त्सुनामी, एलियन हल्ला आणि बरंच काही…


सोफिया, बल्गेरिया :

लवकर २०२१ साल संपुष्टात येऊन अवघं जग २०२२ सालात प्रवेश करणार आहे. याच दरम्यान जगभरा प्रसिद्ध असलेल्या बल्गेरियाचे दिवंगत ‘भविष्यवक्ते’ बाबा वेंगा पुन्हा एकदा आपल्या भविष्यवाणीसाठी चर्चेत आले आहेत. (Vangelia Pandava Gusterova – Baba Vanga from Bulgaria)

अमेरिकेत अलकायदाकडून करण्यात आलेला ९/११ चा दहशतवादी हल्ला असो की त्सुनामी… बाबा वेंगा यांनी केलेल्या अनेक भविष्यवाणी आतापर्यंत प्रत्यक्षात खऱ्या ठरल्या आहेत. याच बाबा वेंगा यांनी २०२२ या नव्या वर्षासाठी नवी भविष्यवाणी केली होती. बाबा वेंगा यांना बाल्कन प्रदेशातील ‘नॉस्ट्राडेमस’ म्हणूनही ओळखलं जातं.

२०२२ साली करोनापेक्षाही घातक विषाणूला जगाला तोंड द्यावं लागेल, अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली आहे. इतकंच नाही तर त्यांच्या म्हणण्यानुसार, नव्या वर्षात पृथ्वीवर परग्रहवासियांकडून अर्थात एलियन्सकडून हल्ला होण्याची शक्यता आहे.

भारतासाठीही बाबा वेंगा यांनी धोक्याचा इशारा दिला आहे. टोळ हल्ल्यामुळे भारतावर उपासमारीची वेळ येऊ शकते, असं बाबा वेंगांनी म्हटलंय.

कोण होते बाबा वेंगा?

बाबा वेंगा यांचं खरं नाव वेंगेलिया गुश्तेरोवा असं आहे. बाबा वेंगा यांचा जन्म १९११ मध्ये झाला होात तर १९९६ मध्ये त्यांचं निधन झालंय. ईश्वराकडून भविष्य पाहण्याची शक्ती आपल्याला मिळाल्याचा दावा वेंगा यांनी केला होता. वयाच्या १२ व्या वर्षी एका भीषण वादळात बाबा वेंगा यांची दृष्टी गेली. उल्लेखनीय म्हणजे, वेंगा यांनी आपल्या मृत्यूची स्वत:च भविष्यवाणी केली होती. तीही अचूक ठरली. १९९६ साली आपल्या मृत्यूपूर्वी बाबा वेंगा यांनी ५०७९ सालापर्यंत भविष्यवाणी केली होती.

आतापर्यंत खऱ्या ठरलेल्या भविष्यवाणी

५०७९ साली जगाचा अंत होईल, असं बाबा वेंगा यांचं म्हणणं होतं. आपल्या मृत्यूपूर्वी सोव्हिएत युनियनचं विघटन, २००२ मध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला, २००४ साली आलेली त्सुनामी, एका आफ्रिकन अमेरिकन व्यक्तीची अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवड, ब्रिटनची राजकुमारी डायना हिचा मृत्यू तसंच २०१० ची ‘अरब स्प्रिंग’ यांसारखे अनेक अचूक अंदाज बाबा वेंगा यांनी बांधले होते.

MCC: भारत दौऱ्यापूर्वी नेपाळ पंतप्रधान देउबा चीनला मोठा झटका देणार?
पृथ्वीवरचा सूर्य : पृथ्वीवर इथे तयार होतेय सूर्याहून दुप्पट उष्णता
२०२२ सालासाठी बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

– ‘टाईम्स नाऊ’च्या रिपोर्टनुसार, नवीन वर्षात जगाला नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावं लागेल, असा दावा बाबा वेंगा यांनी दावा केला आहे

– ऑस्ट्रेलिया आणि अनेक आशियाई देशांमध्ये भीषण पूर येऊ शकतो.

– २०२२ साली करोनापेक्षाही अधिक धोकादायक व्हायरस जगाचं दार ठोठावू शकतात.

– शास्त्रज्ञांची एक टीम सायबेरियामध्ये एक नवीन विषाणू शोधून काढणार, जो आतापर्यंत बर्फात गोठलेल्या स्वरुपात होता, असंही बाबा वेंगा यांनी म्हणून ठेवलंय.

– जगभरात पिण्याचं पाणी हा चिंतेचा विषय ठरू शकतो. येत्या वर्षभरात जगातील अनेक देशांना पिण्याच्या पाण्याच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो, असा दावा बाबा वेंगा यांनी केला आहे.

– २०२१ साली टोळ हल्ल्यामुळे जग त्रस्त झालं होतं. बाबा वेंगा यांच्या दाव्यानुसार, टोळांचे थवे भारतातील पिकांवर आणि शेतांवर हल्ला करतील, ज्यामुळे भारतात तीव्र उपासमार होऊ शकते.

– २०२० साली भारतात टोळांनी राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात पिकांवर हल्ला करून शेती उद्ध्वस्त केली होती.

– २०२२ साली पृथ्वीवरील जीवनाचा शोध घेण्यासाठी परग्रहवासियांकडून ‘ओमुआमुआ’ हा लघुग्रह धाडला जाईल, अशी भविष्यवाणीही वेंगा यांनी आपल्या मृत्यूपूर्वी करून ठेवली आहे.

covid tablet : गुड न्यूज! करोनावर आली गोळी… औषधाला अमेरिकेने दिली मंजुरी
omicron : चांगली बातमी! ओमिक्रॉनच्या संसर्गावर दोन अभ्यास, निष्कर्षात म्हटले…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *