अरे देवा! ऊसाच्या फडातून मोदींची ‘मन की बात’ अधुरीच, Live सुरु झालं आणि…


औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. या कार्यक्रमात मोदी प्रत्येकवेळी देशातील विविध भागातील लोकांशी संवाद साधत असतात. असाच काही संवाद पंतप्रधान मोदी हे रविवारी झालेल्या मन की बातमध्ये औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील रामनगरच्या ऊस तोड कामगारांशी संवाद साधणार होते, पण असं काही झालं की ही मन की बात अधुरी राहिली.

झालं असे की, कन्नडच्या रामनगर परिसरातील शेतकरी तसेच ऊसतोडणी कामगारांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी मन की बात या ८४ व्या भागाच्या कार्यक्रमाद्वारे संवाद साधण्यासाठी आयोजन करण्यात आले होते. रविवारी (दि.२६) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दर महिन्याला होणाऱ्या सर्वसामान्य जनतेशी संवादाचा मन की बात या कार्यक्रमात कन्नड तालुक्यातील रामनगर येथील उसाच्या फडात जाऊन परिसरातील शेतकरी व ऊसतोड कामगार यांनी यात सहभाग नोंदवला. पण तांत्रिक कारणामुळे थेट पंतप्रधानांशी संवाद झालाच नाही.

दुबईहून आलेल्या तरुणाची ना दिल्ली ना औरंगाबादेत चाचणी, आता धक्कादायक रिपोर्ट समोर
मोदींच्या मन की बातमध्ये उसाच्या फडातून लाईव्ह होऊ शकलं नाही, त्यामुळे दूरदर्शनच्या चमूने लाईव्ह कार्यक्रम दाखवला व नंतर ऊस तोड मजुरांशी हितगुज करत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

अन् ‘मन की बात’ आधुरीच…

उसाच्या फडातून थेट मोदी यांच्यासोबत शेत संवाद साधणार म्हणून पूर्ण तयारी झाली होती. कैमरे,लाईट आणि बाकी काही सर्व व्यवस्था सुद्धा झाली होती. पण लाईव्हच्या वेळी काही तरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लाईव्ह होऊ शकलं नाही आणि शेतकऱ्यांची मन की बात आधुरीच राहिली.

ओमिक्रॉननंतर ‘या’ भयंकर आजाराने चिंता वाढवली, १० नवे रुग्ण समोर; रक्ताची गरज वाढणारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *