केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून १०८ वर्षीय आजोबांचा फोटो ट्विट, म्हणाले, ‘लस घ्यायला लागतीय’


हिंगोली : कोरोना लसीकरण मोहिम देशभरात राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे. पहिला डोसला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. पण आता दुसऱ्या डोसला नागरिक म्हणावा असा प्रतिसाद देताना दिसून येत नाहीयत. अशातच हिंगोली जिल्ह्यातील शिरड शहापूर येथील रहिवासी असलेल्या १०८ वर्ष वय असलेले उत्तमराव मास्ट यांनी काल कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला. हाच फोटो देशाचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविय यांनी ट्विट करत आजोबांचं अभिनंदन केलं आहे शिवाय लस घेण्यासाठी देशवासियांना फोटोद्वारे आवाहन केलं आहे.शिरड शहापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील विभागाच्या वतीने प्रत्येक घरी जाऊन कोरोना लसीकरण मोहीम राबवत आहे. त्याच माध्यमातून उत्तमराव मास्ट यांना लस देण्यात आली आहे.

लस घेण्यासाठी अनेक जण कुचराई करत आहेत. परंतु त्या सर्वांसाठी आदर्श ठरलेत १०८ वर्षीय उत्तमराव. त्यांचा लस घेतानाचा फोटो केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडविय यांनी ट्विट केला आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यात शिरड शहापूर हे गाव आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री यांनी फोटो ट्विट केल्यामुळे १०८ वर्षांच्या आजोबाचे लसीकरण हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.

१०८ वर्षीय आजोबा लस घेण्यास दिरंगाई करत नाहीत तर मग तरुण वयातील पोरं, चाळीशी ओलांडलेल्या व्यक्ती, वृद्ध व्यक्ती लसीकरणासाठी दिरंगाई का करत आहेत? असाच सवाल केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी फोटोच्या माध्यमातून विचारण्याचा प्रयत्न केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *