omicron latest update: ओमिक्रॉनबाबत मोठी बातमी! राज्यात आज ३१ नव्या रुग्णांचे निदान, मुंबईत सर्वाधिक रुग्ण


हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ३१ नव्या ओमिक्रॉन रुग्णांचे निदान झाले आहे.
  • त्यांपैकी मुंबईत सर्वाधिक २७ रुग्णांचे निदान झाले आहे.
  • आतापर्यंत राज्यात एकूण १४१ जणांना ओमिक्रॉनची लागण झालेली आहे.

मुंबई: ओमिक्रॉनने राज्याची चिंता वाढवली असून गेल्या २४ तासांमध्ये राज्यात एकूण ३१ नव्या ओमिक्रॉन रुग्णांचे निदान झाले आहे. या ३१ रुग्णांपैकी मुंबईत २७, ठाण्यात २, पुणे ग्रामीण आणि अकोल्यात प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. याबरोबरत आतापर्यंत राज्यात एकूण १४१ रुग्णांना ओमिक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. (omicron in maharashtra update 31 more omicron patients tested positive in maharashtra)

मुंबईत आढळलेले २७ रुग्ण हे मुंबई विमानतळावर केलेल्या तपासणीत आढळले असून त्यांपैकी ४ रुग्ण हे गुजरात, ३ रुग्ण कर्नाटक आणि केरळ आणि दिल्लीतील प्रत्येकी २ रुग्ण, तर छत्तीसगड, उत्तर प्रदेश, जळगाव, ठाणे, नवी मुंबई आणि औरंगाबादमधील प्रत्येकी एका रुग्णाता समावेश आहे. तर दोघे हे परदेशी नागरिक आहेत.

क्लिक करा आणि वाचा- चिंताजनक! विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आणखी ३२ जणांना करोना

आतापर्यंत सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण हे मुंबईत आढळले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण ७३ जणांना ओमिक्रॉनची लागण झालेली आहे. तर पिंपर चिंचवड मध्ये १९ जणांना ओमिक्रॉनची लागण झालेली आहे. पुणे ग्रामीण भागात १६, पुणे महापालिका क्षेत्रात ७, सातारा आणि उस्मानाबादमध्ये प्रत्येकी ५, ठाणे महापालिका क्षेत्रात ३, कल्याण, डोंबिवली, नागपूर आणि औरंगाबादमध्ये प्रत्येकी २ आणि बुलडाणा, लातूर, अहमदनगर, अकोला, वसई विरार, नवी मुंबई आणि मिरा भाईंदरमध्ये प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.

क्लिक करा आणि वाचा- परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा धक्का; दापोलीतील साई रिसॉर्टला केंद्राची नोटीस

राज्यात आज १,६४८ नवे रुग्ण

दरम्यान, राज्यात आज एकूण १ हजार ६४८ जणांना करोनाची लागण झाली असून गेल्या २४ तासांमध्ये एकूण ९१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत एकूण ६६ लाख ५७ हजार ८८८ इतक्या रुग्णांना करोनाची लागण झालेली आहे. राज्यात एकूण ८९ हजार २५१ लोक होम क्वारंटाईन आहेत, तर ८९१ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९७.६७ टक्के इतका असून राज्यातील मृत्यू दर २.१२ टक्के इतका आहे.

क्लिक करा आणि वाचा- गिरणी कामगारांना मुंबईतच ३२० चौरस फुटांचे घर देण्याची घोषणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *