रोहिणी खडसेंच्या अटकेची मागणी; शिवसैनिकांनी घातला पोलिसांना घेराव


हायलाइट्स:

  • खडसे कुटुंब विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आता आणखी टोकदार
  • रोहिणी खडसेंच्या अटकेची शिवसेनेकडून मागणी
  • मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा ठिय्या

जळगाव: मुक्ताईनगर तालुक्यात खडसे कुटुंब विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आता आणखीनच टोकदार झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे व परस्पर विरोधी गुन्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या समोर ठिय्या मांडला आहे. (Jalgaon News Live Update)

मुक्ताईनगर मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपनंतर जळगावात शिवसेना-राष्ट्रवादी यांचा वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांना चोप देण्याचे वक्तव्य करणाऱ्या रोहिणी खडसे यांना अटक करा व परस्परविरोधी दाखल गुन्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला अटक करा या मागणीसाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या मांडला.

औरंगाबादमध्ये ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी रोहिणी खडसे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांनाही घेराव घातला. या सर्व घडामोडींमुळे जळगावात राजकीय वातावरण तापलं असून दोन्ही गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

vaccinations : मोठी बातमी : मुलांच्या लसीकरणाच्या निर्णयावर एम्सच्या तज्ज्ञाचा तीव्र आक्षेप, म्हणाले…

नेमकं काय घडलं?

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरील एका पोस्टवरुन पुन्हा राडा झाला असून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन वाद घातला. यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीकडून शिवसेना कार्यकर्त्यांवर विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली. या सर्व घटनेनंतर रोहिणी खडसे यांनी संताप व्यक्त करत वेळप्रसंगी आंदोलन करण्याचा तसंच जशाच तसे उत्तर देत चोप देण्याचा इशाराही दिला होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *