औरंगाबादमध्ये ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला


औरंगाबाद : औरंगाबादच्या पैठण येथील नाथमंदिरात शनिवारी मंठा (जिल्हा जालना) येथील १२ कुटुंबातील ५३ महिला-पुरुषांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन विधीवत हिंदुधर्म स्विकारला. धर्मजागरण विभाग व नाथवंशज यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. ब्राह्मण सभेने यासाठी पुढाकार घेऊन हा ऐतिहासिक निर्णय घेतला. तर पैठणच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी हिंदुधर्म शास्रानुसार सदर धर्मविधीचे पौरोहित्य केले.

याबाबत पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश कमलाकर शिवपुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘जालना जिल्ह्यातील मंठा येथील १२ कुटुंबातील ५३ ख्रिश्चन महिला पुरुषांनी पुन्हा हिंदु धर्मात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. ख्रिश्चन धर्माचा त्याग करून हिंदू धर्मवापसी करता येईल का?, अशी विचारणा झाल्यावर पैठणच्या ब्राह्मण सभेच्या वतीने पुढाकार घेण्यात आला. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्याने धार्मिक विधी करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यानुसार नाथमंदिरात शांतीब्रम्ह नाथमहाराजांच्या समाधीसमोर विधीवत ‘धर्मवापसी’ सोहळा पार पडला. यावेळी संत एकनाथ महाराज यांचे १४ वे व १५ वे वंशज यांच्यासह पैठणचे वेदशास्त्र संपन्न ब्रम्हवृंदांची उपस्थिती होती.

या पार्श्वभूमीवर संत एकनाथ महाराज समाधी मंदिर (बाहेरील नाथमंदिर) येथे धार्मिक विधी पार पडला. या सर्व परिवारांचे स्वागत व पुजन हभप नाथवंशज रावसाहेब महाराज गोसावी व किर्तनमहर्षी प्रफुल्लबुवा तळेगावकर महाराज व नाथवंशज रघुनाथ महाराज गोसावी (पालखीवाले) यांनी केले.

आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…

१२ कुटुंबातील ५३ ख्रिश्चन महिला पुरुषांनी धर्मांतर केल्यानंतर मंठा तालुक्यातील आणखी २२ ख्रिस्ती कुटुंबातील जवळपास ६५ महिला पुरुष ख्रिश्चन धर्माचा त्याग करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ५ जानेवारी रोजी धार्मिक मुहूर्तावर पैठण येथील नाथमंदिरातच या धर्मांतर विधीचे आयोजन करण्यात आले आहे. ब्राह्मण सभेच्या पुढाकाराने ही ‘धर्मवापसी’ केली जाणार आहे. अशी माहिती पैठण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुयश शिवपुरी यांनी दिली.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *