चालकाचं नियंत्रण सुटलं, जीप-कारची समोरासमोर धडक, ३ जण जागीच ठार


म.टा.प्रतिनिधी, परभणी : जीप-कारची समोरासमोर जोरदार धडकेत तीन जण जागीच ठार झालेत तर चारजण गंभीर जखमी झालेत. परभणीच्या पालम-लोहा या राष्ट्रीय मार्गावर पेठशिवणी गावानजीक डॉ बाबासाहेब आंबेडकर सहकारी सुतगिरणीच्या दुपारी चारच्या सुमारास ही घटना घडली आहे.

अपघातानंतर पेठशिवणी येथील नागरिक तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी मदत केली. जीप क्रमांक एम एच २२ एएम ७३३३ व कार क्रमांक एमएच ०४ ई टी २७३४ ही दोन्ही वाहने रस्ता ने जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटून एकमेकांना समोरा समोर धडक दिली आहे.

या अपघातात दोन्ही वाहनाचे समोरील बाजू चक्काचूर झाल्या आहेत. आतील तीन प्रवाशी जागेवरच ठार झाले ,असून ४ ते ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पालम ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. मयत झालेल्या प्रवाशाची नावे मात्र अद्याप समजू शकली नाहीत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *