पोस्टाने शंभर रुपयांचा बाँडपेपर पाठवून तलाक; महिलेची पतीविरोधात पोलिसात धाव


औरंगाबाद: शहरातील इंदिरानगर बायजीपुरा भागात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणीला तिच्या पतीने चक्क पोस्टाने शंभर रुपयांचा बाँडपेपर पाठवून तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. पतीकडून अशाप्रकारे एकतर्फी तलाक मिळाल्याचं पाहून पीडितेला धक्काच बसला. याप्रकरणी तरुणीने पोलिसात धाव घेत पतीविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पिडीत तरुणीने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, १ ऑक्टोबर २०२० मध्ये बीडच्या विद्या नगर भागात राहणाऱ्या २३ वर्षीय व्यक्तीसोबत तिचं मुस्लीम रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतर १ महिना पीडितेला सासरच्या लोकांनी चांगली वागणूक दिली, परंतु त्यानंतर पती व त्याच्या नातेवाईकांकडून नवीन घर घेण्यासाठी १० लाख रुपय घेऊन आणण्याची मागणी वारंवार करण्यात येऊ लागली. त्यामुळे हतबल झालेल्या पीडित तरुणीने २० ऑक्टोबर २०२१ रोजी बीड शहर पोलीस स्टेशन येथे पती व त्याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

तेव्हापासून पीडित तरुणी आपल्या आई-वडिलांकडे राहत होती. असे असताना चार महिन्यांपूर्वी पीडितेला तिच्या पतीने स्पीड पोस्टने शंभर रुपयांचा बाँडपेपर पाठवून त्यावर तलाक देत असल्याचा उल्लेख केलेला होता.

बाँडपेपरसोबतच एक ४ हजार ५०० रुपयांचा डिमांड ड्राफ्त होता. ज्यात जेवणावेळी व इतर खर्चाचे मोबद्दल्यात ४ हजार ५०० रुपये दिले असल्याचा उल्लेख करण्यात आला होता. त्यामुळे पतीकडून मिळालेल्या एकतर्फी तलाक पाहून पीडित महिलेला धक्का बसला आहे. पीडित महिलेने पतीविरोधात जरी गुन्हा दाखल केला असला तरी देखील पती-पत्नी म्हणून नाते कायम आहे.

दरम्यान, तलाक माघे घेण्यासाठी अनेकदा विनंती करुनही पतीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अशाप्रकारे शंभर रुपयांच्या बाँडवर उर्दु भाषेत तलाकनामा बनवून एकतर्फी बेकायदेशीररित्या तलाक दिल्याच्या कारणावरून पीडित महिलेने पोलिसात तक्रार दिली असून, याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात मुस्लिम महिला (घटस्‍फोटहक्‍क संरक्षण) अधिनियम, १९८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *