अंघोळीसाठी बाथरुममध्ये गेलेल्या महिलेचा अचानक मृत्यू; काय घडलं नेमकं?


हायलाइट्स:

  • औरंगाबादमध्ये घडली धक्कादायक घटना
  • अंघोळीसाठी गेलेल्या महिलेचा मृत्यू
  • अपघात की आत्महत्या अद्याप अस्पष्ट

औरंगाबादः औरंगाबादच्या पुंडलिकनगर भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेलेली ६० वर्षीय महिला जळालेल्या अवस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही महिला मोठ्याप्रमाणात भाजल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. घरातून धूर निघत असल्याचं शेजाऱ्यांनी पहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा अनंतसिंग हजारी वय ६० (रा. न्यू विशालनगर) असे मृत महिलेचे नाव आहे. रेखा या पती व मुलासह विशाल नगर परिसरात राहतात. त्यांच्या पतीचे हॉटेलच व्यवसाय आहे. तर मुलाचे देवगिरी महाविद्यालयात शिक्षण सुरु आहे. शुक्रवार सकाळी मुलगा महाविद्यालयात गेला व पती हॉटेल उघडण्यासाठी गेले होते. दरम्यान, अकरा वाजेच्या सुमारास रेखा यांच्या घरातून मोठमोठ्याने आवाज येत होता. त्यामुळं शेजाऱ्यांनी बाहेर येऊन पाहिले असता हजारी यांच्या घरातून मोठ्याप्रमाणात धूराचे लोट निघत होता. त्यानंतर घाबरलेल्या शेजाऱ्यांनी याबाबत रेखा यांच्या मुलाला फोन करून माहिती दिली.

वाचाः मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुष्यासाठी पायी तिरुपतीला निघाले मात्र वाटेतच मृत्यूने गाठलं

रेखा यांचा मुलगा कॉलेजमध्ये असल्याने त्याने या घटनेची माहिती तात्काळ वडीलांना दिली. रेखा यांचे पती व मुलगा घरी येईपर्यंत शेजाऱ्यांनी दरवाजा तोडून बघितले असता रेखा या अंघोळीच्या बाथरूममध्ये भाजलेल्या अवस्थेत होत्या. त्यांना शेजाऱ्यांच्या मदतीने तात्काळ घाटी रुग्णालयात उपचारांसाठी हलविण्यात आले.

वाचाः ऐन हिवाळ्यात पाऊस बरसणार; विदर्भ, मराठवाड्याला यलो ॲलर्ट

रुग्णालयात नेईपर्यंत त्या ९५ टक्के भाजलेल्या होत्या. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. दरम्यान, रेखा यांचा मृत्यू नातेवाईकांनी शॉर्ट सर्किटमुळे आग लागून मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तसंच, रेखा यांचा अपघाती मृत्यू होता की आत्महत्या याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

वाचाः आईची सतत आठवण यायची म्हणून गर्भवती लेकीने उचलले धक्कादायक पाऊलSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *