आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेमध्ये प्रा यशपाल खेडकर यांचा गौरव

आंतरराष्ट्रीय तंत्रपरिषदेमध्ये प्रा यशपाल खेडकर यांचा गौरव Pride of Prof.Yashpal Khedkar in International Technical Council
पंढरपूर- बीजिंग ,चीन येथे झालेल्या ‘नॅशनल कॉन्फरन्स ऑफ मेकॅनिकल अँड इलेक्ट्रीकल टेक्नोलॉजी २०२१ (आय.सी.एम.इ.टी. २०२१)’ या तंत्र परिषदेत स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. यशपाल खेडकर यांनी सादर केलेल्या शोध निबंधाबद्दल ‘बेस्ट प्रेझेंटेशन इन कॉन्फरन्स’ चा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले गेले. या पुरस्काराने स्वेरीचा झेंडा चीनमध्ये फडकला आहे.

 ‘द एक्सपेरिमेंटल स्टडी ऑफ मॉडिफाइड एम. आर.डँम्पर’ हा प्रा. खेडकर यांचा सादरीकरणाचा विषय होता. प्रा.खेडकर यांनी प्रचलित डँम्परमध्ये उपयुक्त बदल सुचवून त्यावर केलेले परीक्षण सदर शोधनिबंधात नमूद केले होते. दिनांक २६ एप्रिल रोजी कोविड-१९ मुळे ऑनलाइन पद्धतीने त्यांनी आपल्या शोधनिबंधाचे सादरीकरण केले. जगभरातून विविध दोनशेहून अधिक शोधनिबंधा तून प्रा.खेडकर यांच्या शोधनिबंध सादरीकरणाला ‘बेस्ट प्रेझेंटेशन इन कॉन्फरन्स’ हा पुरस्कार दिला गेला. या विषयातील संशोधन करण्यासाठी त्यांना जैन विद्यापीठ,बंगलोर येथील डॉ. सुनील भट व डॉ.एच.आदर्श यांचे मार्गदर्शन लाभले. ‘मेकॅनिकल व्हायब्रेशन’ या अतिशय महत्त्वाच्या विषयातील हे संशोधन असून मेकॅनिकल व सिव्हील स्ट्रक्चर या विषयातील अनेक ठिकाणी या संशोधनाचा भविष्यात उपयोग होऊ शकेल. 

प्रा.खेडकर यांनी स्वेरीच्या संशोधन संस्कृतीला आणि प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सरांच्या विशेष मार्गदर्शनाला आपल्या यशाचे श्रेय दिले आहे. या यशाबद्दल स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे,संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे विश्वस्त व  पदाधिकारी,बी.फार्मसीचे प्राचार्य डॉ.मिथुन मणियार,डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.एन. डी.मिसाळ,डी.फार्मसीचे प्राचार्य प्रा.सतिश मांडवे, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.संदीप वांगीकर,प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रमुख डॉ.सतीश लेंडवे यांच्यासह सर्व अधिष्ठाता,विभागप्रमुख, प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक आणि  विद्यार्थ्यांनी प्रा.खेडकर यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: