शेकडो मुलांच्या गर्दीत ख्रिसमसचा कार्यक्रम; राष्ट्रवादीकडूनच शासनाचे आदेश धाब्यावर
हायलाइट्स:
- बदलापुरात ख्रिसमसच्या कार्यक्रमात शेकडो मुलांची गर्दी.
- राष्ट्रवादी काँग्रेसने केले कार्यक्रमाचे आयोजन.
- ख्रिसमसच्या कार्यक्रमात करोना नियमांचे उल्लंघन.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक!अंबरनाथमध्ये पोलीस चौकीबाहेरच लष्करी जवानाला मारहाण; घटना कॅमेऱ्यात कैद
राज्यात आणि संपूर्ण देशभरात ओमिक्रॉन विषाणूचं संकट पुन्हा एकदा वाढायला सुरुवात झाली आहे. थर्टीफर्स्टच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्यात नाईट कर्फ्यू आणि इतर निर्बंध लावायला सुरुवात केली आहे. यामागे गर्दी होऊ नये आणि ओमीक्रॉंन विषाणूचा फैलाव होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र बदलापूरच्या जाधव कॉलनी – स्वप्ननगरी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसनं लहान मुलांसाठी ख्रिसमसचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शेकडो लहान मुलांची गर्दी झाली होती.त्यातच स्टेजवर असलेल्या सांताक्लॉजने लहान मुलांच्या दिशेनं भेटवस्तू आणि चॉकलेट्स फेकायला सुरुवात केल्यानंतर तर लहान मुलांमध्ये अक्षरशः झुंबड पाहायला मिळाली. याचा व्हीडिओ आता व्हायरल झाला आहे.
क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक! वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या अभियंत्याच्या डोक्यात टिकाव घालण्याचा प्रयत्न
आधीच लहान मुलांचं लसीकरण झालेलं नसल्यानं त्यांना ओमिक्रॉनचा सर्वाधिक धोका असताना बदलापुरात राष्ट्रवादीकडूनच लहान मुलांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळतंय. या कार्यक्रमाला पोलिसांनी तरी परवानगी दिलीच कशी? असाही प्रश्न यानंतर उपस्थित झाला असून या सगळ्यावर आता पोलीस प्रशासन काही कारवाई करतंय का? हे पाहावं लागेल.
क्लिक करा आणि वाचा- क्रिकेटच्या खेळपट्टीवरुन राजकीय भागीदाराचे संकेत, शिवेंद्रराजे भोसले मनसे नेत्याच्या भेटीला, चर्चांना उधाण