Omicron :औरंगाबादमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव; शहरात खळबळ, सध्या कोणते नियम लागू?


हायलाइट्स:

  • औरंगाबादेत ओमिक्रॉनचे २ रुग्ण सापडले
  • इंग्लंड आणि दुबईहून आलेल्या दोन व्यक्तींना लागण
  • शहरात एकाच दिवशी दोघांचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह

मोसिन शेख, औरंगाबाद : देशभरासह राज्यात चिंता वाढवणाऱ्या ओमिक्रॉनचा आता औरंगाबाद शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. इंग्लंड आणि दुबईहून आलेल्या दोन व्यक्तींची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांच्या स्वॅबचे नमूने पुण्यातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅबकडे पाठवण्यात आले होते. आज आलेल्या अहवालात या दोन्ही व्यक्तींचा ओमिक्रॉनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे मराठवाड्यात आतापर्यंत लातूर -१, उस्मानाबाद – ४ आणि आता औरंगाबादमध्ये – २ असे एकूण ७ ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत.

काही दिवसांपूर्वी, औरंगाबाद येथील तरुण मुंबईत ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आलं होता. त्यानंतर या तरुणांच्या कुटुंबातील व्यक्तींना खबरदारी म्हणून क्वारंटाइन करण्यात आले होते. तसेच त्यांची कोरोना चाचणी केली असता तरुणाच्या वडिलांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते. ज्याचा रिपोर्ट आज आला असून, तरुणाचे वडील सुद्धा ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

इंग्लंडहून आलेल्या तरुणाचे वडील ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आल्याने शहरात खळबळ उडाली असतानाच आणखी एक जण ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आला असून, शहरात एकाच दिवशी दोघांचा ओमिक्रॉन रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दुसरा रुग्ण हा दुबईहून आलेला होता, त्याचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने स्वॅब पुण्याला पाठवण्यात आले होते, ज्याचा ओमिक्रॉन रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे.

ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता, औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा आणि शहरासाठी नवी नियमावली 27 डिसेंबर रोजी जारी केली जाईल, असं जाहीर केलं आहे. सध्या 30 नोव्हेंबरपासून जिल्ह्यात गर्दी नियंत्रणाबाबत दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी सुरु आहे.

औरंगाबादमध्ये सध्या कोणते नियम लागू?

  • ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर चित्रपटगृह, नाट्यगृह, मंगल कार्यालय, सभागृहात बंदिस्त जागेवर होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमात एकूण क्षमतेच्या 50 टक्के लोकांना परवानगी
  • लग्न समारंभातील उपस्थितीवर निर्बंध, रात्री 9 नंतर संचारबंदी असल्याने हॉटेलवर विविध बंधने

मराठवाड्यात आतापर्यंत लातूर -१, उस्मानाबाद – ४ आणि आता औरंगाबादमध्ये – २ असे एकूण ७ ओमायक्राॅनचे रुग्ण आढळले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *