महाराष्ट्रातल्या ‘या’ जिल्ह्यात एका महिन्यात १० बालविवाह रोखले


हिंगोली : सध्या शासनाने मुलींच्या लग्नाचे वय २१ वर्ष केले आहे. परंतु, अनेक ठिकाणी कायद्याचे उल्लंघन केले जात आहे. बालपणीच मुलींचे लग्न लाऊन देण्याचे प्रमाण ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे अर्धवट शिक्षण सोडून घ्यावे लागत आहे. आणि पालकांनी ठरवून दिलेल्या ठिकाणी संसार थाटवा लागत आहे. यामुळे लहान वयात लग्न केल्यामुळे शारीरिक व मानसिक आजाराना बळी पडावे लागत आहे. परंतु समाजातील जागरूक नागरिक व ग्राम स्तरावर स्थापन केलेल्या ग्राम बाल संरक्षण समाज समितीच्या माध्यमातुन समजात होणाऱ्या बाल विवाहाची महिती चाईल्डलाईन ( १०९८ ) या टोल फ्री क्रमांकावर फोन करण्याचे आवाहन केले आहे.

जिल्ह्यात ३० नोव्हेंबर पासुन आजपर्यंत एका महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात १० बाल विवाह रोखण्यात आल्याची महिती बाल विकासअधिकारी हिंगोली व्ही.जी.शिंदे यांनी दिली आहे. आपल्या गावात किंवा आपल्या परिसरात बालविवाह होत असल्यास तात्काळ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास अथवा टोल फ्री नंबर वर महिती देण्याचे आव्हान सुद्धा शिंदे यांनी केले आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा मोठा दणका; बडतर्फीच्या कारवाईवर दिला निर्णय
तसेच जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामसेवक यांनी विशेष लक्ष द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिल्या आहेत. हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा बाल संरक्षण कक्षाची आढावा बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना पापळकर म्हणाले, बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी तालुका बाल संरक्षण समिती संदर्भातील सुचना फलक प्रत्येक तहसील कार्यालयात लावावेत.

शिक्षक पतीची बेल्टने पत्नीला मारहाण, काही समजण्याआधीच सासऱ्याने केस पकडले आणि…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *