शिक्षक पतीची बेल्टने पत्नीला मारहाण, काही समजण्याआधीच सासऱ्याने केस पकडले आणि…


औरंगाबाद : दारुमुळे गुन्ह्यांचे अनेक गंभीर प्रकार झाल्याचं समोर आलं आहे. असाच एक धक्कादायक प्रकार औरंगाबादमध्ये समोर आला आहे. दारूचे व्यसन असलेला पती आपल्या भावासोबत दारू पिऊन आल्यानंतर पत्नीला रोज शिवीगाळ करायचा. पण यावेळी सासऱ्यानेही असं काही केलं की संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रोज पती शिवीगाळ करायचा पण यावेळी सासऱ्यानेही सुनेला बेदम मारहाण केली. तिचे केस धरून भींतीवर ढकलून दिल्याची घटना औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील नवजीवन कॉलनीत समोर आली आहे. या प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापूर शहरात राहणाऱ्या रितेश शरद जोशी यांना दारूच व्यसन आहे. त्यामुळे दारू पिऊन पत्नीला ते नेहेमीच त्रास देत असे.

संशयाचं भूत! दिराला पाणी दिलं म्हणून पतीला राग, पत्नीसोबत केलं भयंकर कृत्य
गुरुवारी पत्नी आश्विनी घरात बसल्या असताना पती रितेश जोशी आणि दिर रुपेश दोघेही दारु पिऊन घरात येताच अश्विनी यांना शिवीगाळ करू लागले. तर काही समजण्याच्या आत सासर्‍याने अश्विनी यांचे केस धरून भीतीवर ढकलून दिले. तर पती रितेशने कमरेच्या ब्लेटने मारहाण करायला सुरुवात केली.

पती आणि सासऱ्याच्या मारहाणीत अश्विनी या जखमी झाल्या असून त्यांच्यावर वैजापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर अश्विनी यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस तठाण्यात पती, दिर आणि सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाकर करून दे म्हणताच, सुनेने सासूच्या हाताची बोटं मोडली; एवढेच नाही तर…Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *