शासनाच्या नावाने जोगवा मागितला मात्र सरकारकडे जमा केलाच नाही; काय आहे हा प्रकार?


रहिम शेख, उस्मानाबाद

तुळजापूरः

तुळजापूर येथील एसटी कर्मचारी ४ नोव्हेंबर पासुन विविध मागण्यांसाठी एस टी डेपोच्या प्रवेशद्वार समोर संपावर होते त्यातील काही प्रमुख मागण्या शासनाने मान्य केल्या ४१% पगार वाढीसह घरभाडे महागाई भत्त्यात वाढ सुध्दा केली होती. परंतु एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी संपकरी अजूनही आग्रही आहेत. राज्यातील अनेक आगारातील कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. त्यामुळं बहुतांश आगारातील बससेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. मात्र, काही आगारात अजूनही कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर जिल्ह्यात मात्र एक वेगळाच प्रकार घडला आहे. तुळजापूर मधील कर्मचारी शासनाविरोधात रोज वेगवेगळ्या पध्दतीने आंदोलन करत होते. २७ नोव्हेंबर रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी तुळजापुर शहरातील मुख्य रस्त्यावर मंदिर परिसरात शासनाच्या नावाने जोगवा मागितला होता. शासनाकडे कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी पैसे नसल्यामुळे जमा होणारा जोगवा मुख्यमंत्री सहायत्ता निधीला किंवा परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे जमा करणार, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले होते परंतु प्रत्यक्षात मात्र भलतंच घडलं आहे.

वाचाः ओमिक्रॉनचा धोका; राज्यात जमावबंदी लागू, वाचा नवी नियमावली

शहरात फिरुन मागितलेल्या जोगव्यातील हजारो रुपये शासनाकडे जमा न करता कर्मचाऱ्यांनी स्वतःकडे ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत चौकशी केली असता समोर यायला कोणी तयार नाही. काही कर्मचाऱ्यांनी संपातुन माघार घेतली आहे, असं सांगत आम्हाला त्या पैशाचा का झाले हे माहित नाही, असं सांगत आहेत. तर दुसरे म्हणतात मी स्वतःचे पैसे जमा करतो, असं म्हटलं आहे. शासनाच्या नावाने मागितलेला निधी शासनाकडे जमा करायला पाहिजे होता. तसे केलेच नाही उलट स्वःताकडे ठेवुन शासनाची व जनतेची शुध्द फसवणुक झाली असल्याचं मत व्यक्त करण्यात येत आहे.

वाचाः लस नाही तर गावात प्रवेशबंदी; नांदेड जिल्ह्यातील ‘या’ गावात घेतला निर्णयSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *