भाकर करून दे म्हणताच, सुनेने सासूच्या हाताची बोटं मोडली; एवढेच नाही तर…


औरंगाबादः सासू-सुनेचा वाद काही नवीन नाही. मात्र शुल्लक कारणावरून झालेला वाद थेट हाणामारीपर्यंत आणि त्यानंतर पोलीस ठाण्यात गेल्याच्या घटना किंचित पाहायला मिळतात. अशीच एक घटना औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील हिवरखेडा येथे समोर आली आहे. भाकर करून दे म्हणणाऱ्या सासूला सुनेनं हात मोडेपर्यंत मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला आहे.

कन्नड तालुक्यातील हिवरखेडा येथे राहणाऱ्या चंद्रकला राठोड ( वय ६० ) कन्नड शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की घरात असताना त्यांनी आपली सून छाया राठोड ह्यांना मी जेवण केलं नसून मला दोन भाकऱ्या टाकून काहीतरी भाजी करून दे म्हटलं. असे म्हणताच छाया राठोड यांनी आपल्या सासू चंद्रकला यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर डोक्यात बुक्यांनी मारहाण केली. तर एवढ्यावरच न थांबता गालावर चापट मारत डाव्या हाताचे बोट पिरगळून बोट मोडले, असल्याचा आरोप चंद्रकला यांनी केला आहे.

वाचाः कृषी कायद्यांवर नव्याने विचार; केंद्रीय कृषीमंत्र्यांचे मोठे विधान

नवऱ्यालाही केली मारहाण….

आपल्या सुनेच्या विरोधात पोलिसात केलेल्या तक्रारीत चंद्रकला राठोड यांनी म्हटलं आहे की सून आपल्यासोबत भांडण करत असताना आणि मारहाण करत असताना मुलगा किरण राठोड मध्यस्थी करण्यासाठी आला असता त्यालाही छाया राठोड यांनी चापट-बुक्यांनी मारहाण केली असल्याचा आरोप चंद्रकला राठोड यांनी केला आहे. त्यामुळे चंद्रकला यांच्या तक्रारीवरून कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचाः संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा दणका; बडतर्फीच्या कारवाईस स्थगिती देण्यास नकारSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *